
सकाळ वृत्तसेवा
निफाड - 'फेगल' चक्रीवादळाच्या वातावरणामुळे गायब झालेली थंडी परतली आहे. तालुक्यात घसणारा पारा द्राक्ष उत्पादकांसाठी चिंतादायी बनला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर ६.७ इतक्या अंशावर पारा आला आहे. निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष हंगाम भरात येण्याच्या स्थितीत असतानाच बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हबकला आहे.