Weather
sakal
नाशिक: जिल्ह्याच्या पाऱ्यात दोन दिवसांपासून घसरण होत आहे. निफाडमध्ये मंगळवारी (ता. ९) ५.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील ते नीचांकी तापमान ठरले; तर नाशिकमध्येही थंडीचा कडाका कायम आहे. शहराचा पारा ९.३ अंशांपर्यंत खाली आल्याने नाशिककरांना हुहहुडी भरली आहे.