Nashik : ‘वात्सल्य वृद्धाश्रमा’च्या नावाखाली परप्रांतीयांकडून देणगीचे संकलन | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime fraud news

Nashik : ‘वात्सल्य वृद्धाश्रमा’च्या नावाखाली परप्रांतीयांकडून देणगीचे संकलन

नाशिक : शहरातील पंचवटीमध्ये ‘वात्सल्य वृद्धाश्रम’ असून, याच वृद्धाश्रमाच्या नावाखाली परप्रांतातून आलेले वाहन शहरात फिरत आहे. देणगीदारांकडून या वृद्धाश्रमासाठी कोणत्याही स्वरूपातील देणगी मागितली जात आहे.

यामुळे देणगीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वात्सल्य वृद्धाश्रमाकडून असे कोणतेही वाहन देणगीसाठी फिरत नसल्याने परप्रांतीयांकडून देणगीदारांची फसवणूक केली जात आहे. याबाबत देणगीदारांनी जागरूक राहावे व पोलिसांनी कारवाई करावी, असे मागणी केली आहे. (Collection of donations from expatriates under name of Vatsalya Vriddhashrama Nashik Latest Marathi News)

हिरावाडीत वृद्धांसाठी ‘वात्सल्य वृद्धाश्रम’ चालविले जाते. वृद्धाश्रमाचे सेवाभावी क्षेत्रात मोठे कामही आहे. काही दिवसांपासून कर्नाटकातील एक वाहन नाशिक शहर-जिल्ह्यात फिरत आहे. या वाहनातील व्यक्तींकडून वात्सल्य वृद्धाश्रमासाठी देणगीची मागणी केली जाते. आर्थिकसह कपडे, धान्यासह वाटेल ती मदत ते देणगीकारांकडून घेत आहेत.

यासंदर्भात काही जागरूक नागरिकांनी वात्सल्य वृद्धाश्रमाकडे चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात वृद्धाश्रमाच्या संचालकांसह व्यवस्थापकांनी चौकशी केली असता, ते वाहन कर्नाटकातील आहे. अशाच प्रकारे परप्रांतीयांनी औरंगाबाद परिसरातूनही देणगी गोळा केल्याचे समोर आले.

हेही वाचा: Nashik Crime : 75 लाखांचे विदेशी मद्य पाडळी शिवारातून जप्त

देणगीदार वा सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून वात्सल्य वृद्धाश्रमाने सोशल मीडियाच्या माध्यमातून वृद्धाश्रमाचेही कोणतेही वाहन देणगी संकलित करण्यासाठी फिरत नसून देणगी घेण्यासाठी आल्यास देणगी देऊ नये वा त्यासंदर्भात पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

"वात्सल्य वृद्धाश्रमाचे कोणतेही वाहन देणगीसाठी शहरात फिरत नाही. याच वृद्धाश्रमाच्या नावने देणगी गोळा करीत फिरणारे वाहन व त्या व्यक्ती कर्नाटकातील असल्याचे समजते. याबाबत संचालकांकडून लवकरच पोलिसांत तक्रार दिली जाणार आहे."

-चेतन संगमनेरे, व्यवस्थापक, वात्सल्य वृद्धाश्रम, पंचवटी

हेही वाचा: कलाशिक्षक दत्ताजी राठोडांनी ‘I Pad’ने साकारले गणेश

Web Title: Collection Of Donations From Expatriates Under Name Of Vatsalya Vriddhashrama Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..