उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - जिल्हाधिकारी गंगाथरण डी.

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - जिल्हाधिकारी गंगाथरण डी.
SYSTEM

सातपूर (नाशिक) : अंबड, सातपूरबरोबरच जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी केले. कार्यभार स्वीकारल्यानंतर आयमा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. या वेळी ते बोलत होते. आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, बीओटी चेअरमन धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बूब, खजिनदार राजेंद्र कोठावदे, सचिव योगिता आहेर आदी यावेळी उपस्थित होते.

नुकत्याच यशस्वी झालेल्या आयमा इंडेक्स औद्योगिक प्रदर्शनाची माहिती धनंजय बेळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या वेळी दिली. नाशिकमध्ये 2010 कोटींची गुंतवणूक आणण्यात आयमा प्रतिनिधींना यश आल्याचे बेळे यांनी या वेळी निदर्शनास आणले. नाशिक- घोटी दरम्यान नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम तातडीने व्हावे आणि जिल्ह्यातील उद्योजकांचे विविध प्रश्न व समस्या सोडवाव्यात, अशी गळ श्री. बेळे यांनी घातली. औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित आहेत. त्याबाबतही बैठक घेऊन माहिती घेतल्यास व त्याच्या भूसंपादनासाठी आदेश दिल्यास व संबंधितांनी त्याकडे लक्ष पुरविल्यास ही जागा उद्योगवाढीसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी उपलब्ध होऊ शकेल. तसेच चुंचाळे शिवारातील शासनाने पांजरपोळला दिलेली सुमारे 1300 एकर जागासुद्धा उद्योगांसाठी हवी आहे. तरी त्या जागेबाबतही एक बैठक घेतल्यास व त्या जागेची संपादन प्रक्रिया सुरू केल्यास उद्योजकांना खूप मोठी मदत होईल, असेही श्री. बेळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच्या चर्चेच्या वेळी नमूद केले. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी आयमा प्रतिनिधींना सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच विविध सूचनांचा अभ्यास करून उद्योगवाढीसाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील असे अभिवचनही दिले.

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - जिल्हाधिकारी गंगाथरण डी.
बायकोला मोबाईलवर दिला घटस्फोट अन् भरपाई रक्कम 1 रुपया | Nashik
उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध - जिल्हाधिकारी गंगाथरण डी.
दीपक पांडे, कैलास जाधव आणि राजकीय विश्व....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com