Collector Transfer
sakal
नाशिक: कार्यकाळ संपुष्टात आल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे नाशिक महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची, तर सिंहस्थ प्राधिकरणाच्या आयुक्तपदी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.