धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 35298 - कोमल शिंदे. 35299 - नीलिमा महाजन. 35303 - तेजस्विनी धनगर.
--
समाजकार्य महाविद्यालयाची विद्यापीठात भरारी
--
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तिन्ही क्रमांकांवर विद्यार्थिनींची मोहोर
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित, पुणेस्थित समता शिक्षण संस्था संचालित मोराणे (ता. धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २०२५-२६ च्या विद्यापीठ परीक्षेत यश संपादन केले. समाजकार्य पदवी परीक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही क्रमांक पटकावत तसेच पदव्युत्तर पदवी परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी करणारे हे विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
-
विद्यापीठाने नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात महाविद्यालयाच्या कोमल शिंदे हिने समाजकार्य पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच नीलिमा महाजन हिने द्वितीय, तर तेजस्विनी धनगर हिने तृतीय क्रमांक पटकावला. समाजकार्य पदव्युत्तर पदवी परीक्षेत दीपश्री रणधीर विद्यापीठात तृतीय आली. या निकालामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कामगिरीबद्दल समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष प्रा. उषा वाघ, सचिव डॉ. जालिंदर आडसुळे, प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.