Nashik News: खंडणी, धमकीचे फोन आल्यास तात्काळ पोलिसांना कळवा; पोलीस आयुक्तांचे आवाहन

Udayojak Shashikant Jadhav welcoming Police Commissioner Sandeep Karnik at Nima House. Along with Nima President Dhananjay Bele and entrepreneurs.
Udayojak Shashikant Jadhav welcoming Police Commissioner Sandeep Karnik at Nima House. Along with Nima President Dhananjay Bele and entrepreneurs.

Nashik News: कोणत्याही शहरातील गुन्हेगारीमुळे शहराच्या विकासाला खिळ बसत असते. गुन्हेगारांकडून उद्योजक, व्यावसायिकांना लक्ष करीत खंडणीसाठी धमकावले जाते. मात्र याबाबत शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांनी सतर्कता बाळगत तात्काळ पोलीस उपायुक्तांकडे तक्रार कराण्याचे आवाहनच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना शहराच्या विकासाला हातभार लावणार्या घटकांच्या सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे सांगत आश्वस्त केले आणि पदाधिकार्यांशी सुसंवाद साधला. (Commissioner of Police appeals if receive extortion threatening calls inform police nashik news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यानंतर शहरातील उद्योजक आणि बांधकाम व्यवसायाचा आढावा घेतला. त्यासंदर्भात आयुक्त कर्णिक यांनी शहरातील उद्योजक संघटना असलेल्या आयमा व निमा पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे, शहरातील बांधकाम व्यावसायिकांशीही आयुक्तालयात भेट घेत त्यांच्याशीही सुसंवाद साधला.

शहरात यापूर्वी काही उद्योजक, व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावल्याचे प्रकार घडलेले आहेत. तर काही महिन्यांपूर्वी शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणीही उकळण्यात आली होती. तर एका उद्योजकास पाथर्डी फाटा परिसरात क्षुल्लक कारणावरून खूनही करण्यात आला होता.

Udayojak Shashikant Jadhav welcoming Police Commissioner Sandeep Karnik at Nima House. Along with Nima President Dhananjay Bele and entrepreneurs.
Nashik News: अध्यात्माला मिळाली प्रशासनाची साथ! शिधापत्रिकेमुळे उपचार झाले सुलभ; महसूलची तत्परता

या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कर्णिक यांनी शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांशी सुसंवाद साधत शहराच्या विकासाला हातभार लावणार्या या घटकांना आश्वस्त केले.

शहरात बांधकामासह विविध उद्योग संघटना व आयटी क्षेत्राशी सातत्याने बैठका घेत सुरक्षित उद्योग व व्यवसायाकरीता प्रयत्न करणार असल्याची भूमिका पोलिस आयुक्तालयाची असल्याचे सांगितले. कोणत्याही स्वरुपाची लूटमार खपवून घेतली जाणार नाही. खंडणी वा धमकीचे फोन आल्यास थेट पोलिस उपायुक्तांशी संपर्क साधावा. त्वरित कारवाई केली जाईल, अशा सूचना करीत, आयुक्तांनी उद्योजक-बांधकाम व्यावसायिकांना सुरक्षिततेची हमी दिली.

Udayojak Shashikant Jadhav welcoming Police Commissioner Sandeep Karnik at Nima House. Along with Nima President Dhananjay Bele and entrepreneurs.
Sharad Pawar on Onion Export Ban: रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही : शरद पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com