Commissioner Suraj Mandhare statement Software to avoid non teaching activities of  teachers nashik news
Commissioner Suraj Mandhare statement Software to avoid non teaching activities of teachers nashik news

Nashik News: शिक्षकांची अशैक्षणिक कामे टाळण्यासाठी ‘सॉफ्टवेअर’ : आयुक्त सूरज मांढरे

राज्यात दोन कोटी १७ लाख विद्यार्थी, सहा लाख शिक्षक आणि एक लाख शाळा असल्याने शिक्षकांकडे विविध प्रकारची माहिती वारंवार मागविली जाते.

Nashik News : राज्यात दोन कोटी १७ लाख विद्यार्थी, सहा लाख शिक्षक आणि एक लाख शाळा असल्याने शिक्षकांकडे विविध प्रकारची माहिती वारंवार मागविली जाते. या अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षक गुंतून अध्यापनावर परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी सर्व सुविधांयुक्त मोठे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे.

बोर्ड परीक्षांचे सुपर व्हिजन, विद्यार्थ्यांचे निकालासह इतर सुविधा त्यात देण्याचा मानस असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

राज्यभरातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असून, लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहेत.(Commissioner Suraj Mandhare statement Software to avoid non teaching activities of teachers nashik news)

विद्यार्थ्यांचा खुर्दा होण्यासाठी शिक्षण व्यवस्था जबाबदार होऊ देऊ नका. प्रयोगशील व लोकप्रिय होऊन गावातल्या शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू व्हा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी (ता. २२) बाभूळगाव येथील एस. एन. डी. शिक्षण संकुलात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील मुख्याध्यापक व शिक्षकांची सहविचार सभा बोलविण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. सभेला उत्तर महाराष्ट्रातून सुमारे तीन हजार मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी उदय देवरे व प्रवीण पाटील, अशोक कडूस (नगर), बी. जे. पाटील, डॉ. किरण कुवर (जळगाव), विकास पाटील, प्रवीण अहिरे (नंदुरबार), उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसैंदर, वेतन अधीक्षक नितीन पाटील, रामदास मस्के, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, शिक्षक नेते संभाजी पाटील, शालिग्राम भिरूड, सुनील पंडित, आप्पासाहेब शिंदे, आर. एस. बाविस्कर, मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे, संचालक रूपेश दराडे आदींची उपस्थिती होती. या वेळी आमदार किशोर दराडे व आयुक्त मांढरे यांच्या हस्ते जळगाव, धुळे जिल्ह्यातील अनुकंपावरील शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.

आयुक्त मांढरे म्हणाले, की नव्या शैक्षणिक धोरणात अमुलाग्र बदल होणार असून, भविष्यात स्पर्धा मोठी असल्याने येणाऱ्या पिढ्यांना निरुपयोगी वस्तू तयार करू नका. सिल्याबस पूर्ण करणारे म्हणून नव्हे तर मुलांच्या मनात घर करणारे शिक्षक व्हा, आपल्या मुलांच्या बाबतीत वागतात तसे वर्गातल्या मुलांच्या बाबतीत वागा. शिक्षणावर परिणाम होऊ देऊ नका. जे द्यायचे आहे ते प्रामाणिकपणे द्या, असा सल्लाही शिक्षकांना त्यांनी दिला.

Commissioner Suraj Mandhare statement Software to avoid non teaching activities of  teachers nashik news
Nashik News: केंद्रप्रमुख पदोन्नतीचा मार्ग अखेर खुला; जिल्ह्यात 95 शिक्षक होणार केंद्रप्रमुख

लढा सुरूच राहणार : किशोर दराडे

साडेपाच वर्षे सतत शासन आणि अधिकाऱ्यांची भांडण, तुमचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी झटत आहे. याचमुळे विनाअनुदानित माध्यमिक शाळांना २० व ४० टक्के अनुदानासाठी एक हजार १३८ कोटी, तर उच्च माध्यमिक शाळांना २० व ४० टक्के अनुदानासाठी एक हजार ६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यश आले.

२००५ पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला असून, नव्याने नियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी उपोषण करून मिळवून दिले. शिक्षक दिशादर्शक असतो. त्याने विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचे महान कार्य केले आहे. या पुढील काळात या कामात अधिक झोकून द्यावे लागेल, असे आमदार नरेंद्र दराडे म्हणाले.

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होत आहे. काळाबरोबर तुम्हालाही बदलावे लागत असून, नवीन प्रवाह समजून घ्या व ते स्वीकारा. त्याचा शिक्षण क्षेत्रात अवलंब करून आपली शाळा आणि आपल्या विद्यार्थ्यांना नेहमीच टॉपवर ठेवा. परीक्षा पद्धतीतही बदल होत असून, सर्वच परीक्षा निकोप व स्वच्छ

पारदर्शक वातावरणात पार पाडा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी केले. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, निवृत्तीचे वय ६० व्हावे, उर्वरित शिक्षकांना शालार्थ आयडी मिळावे, वैद्यकीय व इतर थकीत बिले मिळावीत, संच मान्यता दुरुस्त कराव्यात, समायोजन थांबवावे या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी या वेळी शिक्षकनेते एस. बी. देशमुख, मोहन चकोर, जे. के. पाटील, साहेबराव कुटे, आर. डी. निकम, डी. पी. महाले, उदय तोरवणे, एस. टी. कदम, एस. के. सावंत, संभाजी पाटील, किरण पगार आदींनी केली. संतोष विंचू यांनी सूत्रसंचालन केले. कुणाल दराडे यांनी आभार मानले.

Commissioner Suraj Mandhare statement Software to avoid non teaching activities of  teachers nashik news
Teacher Bharti Portal: शिक्षक भरतीसाठी 15 दिवसांत सुरू होणार पोर्टल; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com