NMC News : घंटागाड्यांच्या कामाच्या चौकशीसाठी समिती गठित

NMC Garbage Truck
NMC Garbage Truckesakal

Nashik News : महापालिकेकडून शहरात घनकचरा संकलनासाठी घंटागाडी योजना सुरू आहे.

नव्याने दिलेल्या कंत्राटानुसार ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न होण्याबरोबरच छोट्या घंटागाड्या कचरा संकलनासाठी लावल्याने एकूणच घंटागाड्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. (committee has been formed to inquire into working of garbage collector vehicle nashik news)

महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घंटागाडी संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये विशेष करून सातपूर व पंचवटी भागातील तक्रारींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

अनियमित घंटागाडी येणे, नियोजित मार्गावर घंटागाडी न धावणे, घंटागाडीवर जीपीएस न बसविणे, कचरा विलगीकरण न होणे यासंदर्भातील तक्रारींचा समावेश आहे. पंचवटी व सातपूर विभागात अडीच टन घंटागाडी ऐवजी सहाशे किलो क्षमतेच्या घंटागाड्या तैनात करण्यात आले आहे.

नियमानुसार अडीच टन गाडी नसेल, तर दररोज दहा हजार रुपये दंड करण्याची अट करारामध्ये नमूद करण्यात आली आहे. तर जीपीएस नसेल तर दररोज एक हजार रुपये दंड ठेकेदारांकडून वसूल करण्याच्या सूचना आहे. मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमांचे उल्लंघन होत असतानादेखील दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Garbage Truck
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’ च्या देयकांसाठी कामांचे व्हीडीओ आवश्‍यक; मित्तल यांचा कडक पवित्रा

त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी सातपूर व पंचवटी विभागातील घंटागाडी ठेकेदार संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर दहा कोटी रुपयांचे देयके रोखून धरण्यात आली होती. मात्र ती देयके तातडीने अदा करण्यात आल्याने संशय बळावला. एकूणच तक्रारींचा अनुषंगाने आयुक्त गमे यांनी घंटागाडीच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे.

हे अधिकारी करणार चौकशी

वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे हे चौघे अधिकारी निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे काम होत आहे की नाही, याची तपासणी करून आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करतील.

डॉ. कुटे आठ दिवसांच्या रजेवर

चौकशी सुरू होण्यापूर्वीच घनकचरा व्यवस्थापन संचालक व चौकशी समितीतील एक अधिकारी डॉ. कुटे आठ दिवसांच्या रजेवर गेल्या आहेत. आठ दिवसानंतर गमे प्रभारी आयुक्तपदाचा पदभार निघून जाईल व नियमित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे पदभार स्वीकारतील.

त्यामुळे डॉ. कुटे यांच्याकडून वेळकाढूपणाचे धोरण तर राबविले जात नाही ना, असा संशय आरोग्य विभागातील कर्मचारी व्यक्त करत आहे. चौकशी समितीतून खरोखरच काही निष्पन्न होईल का, असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.

NMC Garbage Truck
NMC News : पदोन्नतीचे निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता; कर्मचारी सेनेकडून बेकायदेशीरचा आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com