esakal | nashik : केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचवा
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोचवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारने महत्वकांक्षी प्रकल्प राबविले आहे. या विकास प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सचिव मुकामसिंह किराडे यांनी केले. अनुसूचित जमाती मोर्चाची उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात झाली. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या आदिवासींसाठीच्या उपक्रम व योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवून लाभ मिळून द्यावा. अनुसूचित जमाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गाव, पाड्यापर्यंत पोचून आदिवासींच्या समस्या सोडवाव्यात. प्रभावी बूथ रचना बांधणीसाठी परिणामकारकरीत्या काम करावे. केंद्र सरकारच्या विकास प्रकल्पांची माहिती लोकांपर्यंत पोचवावी.

आमदार काशिनाथ पावरा म्हणाले, आदिवासी भागात आदिवासी समाजाकडून कसल्या जाणाऱ्या वन पट्ट्यातील जमिनी आदिवासींच्या नावावर कराव्यात. हेमंत सावरा यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील जमाती मोर्चाच्या कार्याचा आढावा घेतला. या वेळी व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिक ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, प्रदेश सदस्य लता राऊत, लीला सूर्यवंशी, रंजना भानसी, धुळे जिल्हाध्यक्ष रमन बावरा, जळगाव जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, नगर जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, दीपक भारुड, जगन्नाथ कुंवर, गणेश नाईक, अरुण सोनवणे, पुंडलिक खोडे, यशवंत निकुळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जगन्नाथ कुंवर यांनी केले. मोर्चाचे शहराध्यक्ष प्रा. परशराम वाघेरे यांनी स्वागत केले.

loading image
go to top