नाशिक- जगात युद्ध सुरू आहे, मात्र त्याचा आपल्याशी संबंध नाही, असे समजणे चुकीचे आहे. ते युद्ध सामान्यांसाठी नसून, भांडवलदारांसाठी आहे. आपल्या देशातील नेतृत्व याला विरोध करण्यापेक्षा अमेरिका व इस्राईलची दलाली करीत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आदिवासी, दलित व अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय विद्यमान सत्तेचा पाया आहे, असा थेट आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजित कौर यांनी केला.