दांडियाच्या मैदानावरून भाजप-शिवसेनेत जुंपली; पोलिसानंतरच परवानगी NMCची भूमिका

nashik municipal corporation
nashik municipal corporationesakal
Updated on

नाशिक : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने शिवाजी पार्कचे मैदान मारले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र शिवसेनेला मैदानासाठी झुंजावे लागत आहे. नाशिकमध्ये पंचवटी, सिडको व नाशिक रोड भागात दांडिया रास भरण्यासाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली आहे.(competition between BJP ShivSena and NCP for organize Dandiya Ras in Nashik Latest Marathi News)

वाढत्या राजकीय दबावामुळे महापालिकेने पोलिसांकडे जबाबदारी ढकलून पोलिस परवानगी मिळाल्यानंतरच महापालिका परवानगी देईल असे धोरण अवलंबिल्याने पोलिसांना आता सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.मागील दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे सण- उत्सवावर निर्बंध आले होते. दोन वर्षे जमावबंदी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. परिणामी गर्दी जमविणारे व विशेष करून राजकारणी व्यक्तींसाठी महत्त्वाचे ठरणारे गणेशोत्सव, नवरात्रोत्सवावर पाणी फिरले होते.

यंदा मात्र सर्वच सण उत्सव मोकळ्या वातावरणात असल्याने व निवडणुका जवळ आल्याने निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे. नवरात्रोत्सवात दांडिया गरबा रासला महत्त्व असते. विशेष करून तरुण- तरुणी या उत्सवाची वाट पाहत असल्याने राजकीय लोकांना मतदारांना बांधून ठेवण्याची एक चांगली संधी असते. त्या अनुषंगाने महापालिकेच्या मैदानासाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली.

गरबा दांडिया राससाठी मैदानांची मागणी करण्यात भाजपबरोबरच शिवसेनेनेदेखील आघाडी घेतली. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनादेखील दांडिया रास भरवायचा आहे. मात्र, मैदान एक व मागणी करणारे अनेक निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनासमोर परवानगी देताना प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे वादविवाद निर्माण करणारे खांद्यावरचे ओझे महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या खांद्यावर टाकले आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतरच महापालिकेकडून परवानगी मिळेल, अशी भूमिका घेतल्याने आमदार, खासदार व पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मैदानी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

nashik municipal corporation
नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी गडावर रविवारपासून खासगी वाहनांना ‘No Entry’

या मैदानावरून वाद

सिडकोतील पवननगर उद्यानावरून भाजप व शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. या मैदानाकडे संवेदनशील म्हणून पाहिले जात असल्याने महापालिका प्रशासनाने हात काढून घेत पोलिसांकडे परवानगीसाठी जाण्याचा सल्ला दिला. मैदानासाठी मुंबईहूनदेखील फोन आले, मात्र पोलिसांनी शिवसेना व भाजपचे दोन्ही अर्ज फेटाळून लावले. असाच वाद सातपूर विभागातील शिवाजीनगर भागात निर्माण झाला आहे.

या भागात भाजपच्या माजी नगरसेवकाकडून मैदानाची मागणी करण्यात आली, तर दुसरीकडे तेच मैदान शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला हवे आहे. नाशिक रोड विभागातील मुक्तिधाम शाळा क्रमांक १२६ येथील मैदान शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हवे आहे. परंतु, येथे पक्षऐवजी स्थानिक नागरिकांनीच विरोध केला. स्थानिक नागरिकांना खूष करण्यामागे भाजपच्या माजी नगरसेवकाचा हात असल्याचे संशय आहे. पंचवटीतील हिरावाडी, तसेच मानेनगरमध्येदेखील मैदानावरून वाद निर्माण झाला आहे.

nashik municipal corporation
नवरात्रोत्सवात नावीन्यपूर्ण वस्त्रांना पसंती; यंदा हटके कपडे उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com