नवरात्रोत्सवात नावीन्यपूर्ण वस्त्रांना पसंती; यंदा हटके कपडे उपलब्ध

Navratri Clothes News
Navratri Clothes Newsesakal

बातमीदार : पायल छाजेड

नाशिक : नवरात्रोत्सवाबद्दल सर्वांनाच उत्सुकता असून सर्वांना आता याचे वेध लागले आहे. कोरोना दोन वर्षांच्या काळानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरे होत असल्याने तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यासह थंडावलेल्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. यंदा गरबा, दांडियाचे आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात येत आहे. बाजारपेठेत गरबा दांडियासाठी विविध प्रकारची कपडे, दागिने उपलब्ध झाले आहेत. (Navratri festival 2022 News clothes available this year Nashik Latest Marathi News)

गरबा- दांडियाचा विशेष पोशाख घागरा चोली साधारणतः सर्वच परिधान करतात. यंदा बाजारात हटके प्रकारचे कपडे बाजारात आले आहेत. यात इंडो वेस्टर्न घागरा, छत्तीस कळ्यांचा घागरा, रंगीला घागरा यांसारख्या विविध अन् नावीन्यपूर्ण वस्त्रांना नाशिककर पसंती देत असल्याचे दिसून येते. या वस्त्रांवर शोभून दिसणारी ज्वेलरीही बाजारात दाखल झाली आहे. यात फॅब्रिक, मोत्यासह ऑक्साईड याचा अनोखा मॅच दिसून येत असून, या दागिन्यांना यंदा विशेष पसंती दिली जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

शहरातील नंदन लॉन्स येथे गरबा दांडिया खेळण्यासाठी विशेषतः युवा वर्गाची जास्त गर्दी असते. उत्साहात सण साजरे करताना तरुणाईचा गरबा रात्रीपर्यंत सुरू ठेवावा, असा आग्रह असतो. यात दोन वर्षानंतर गरबा खेळत असल्यामुळे ही मागणी युवा वर्गात मोठ्या प्रमाणावर असल्याची शक्यता असल्याने नवरात्रीचे सर्व नियोजन अगदी जोरदार केले असले तरी नियमांचे मात्र तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. डीजे दहा वाजताच बंद होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली

Navratri Clothes News
पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या मुहूर्तावर; कसमादे पट्यात किलोला दीडशेचा भाव

"दरवर्षी नवरात्रात घागरा चोलीवर ऑक्साईड ज्वेलरीची विक्री होत असे. परंतु, यंदा नवनवीन ज्वेलरीची लोकप्रियतादेखील ग्राहकांमध्ये दिसून येते आहे. यात वजनाला अगदी हलकी असणाऱ्या फॅब्रिक ज्वेलरीचे विशेष आकर्षण आहे." - वृषाली माहेगावकर, विक्रेते

"राजस्थानी लुक करताना घागरा चोलीच्या डिझाईनला कवडीची जोड असल्यास ते अजूनच खुलून दिसतो. त्यामुळे कवड्यांची डिझाईन असलेले केडिया, जॅकेट घागरा चोली त्याचप्रमाणे ज्वेलरीला ग्राहक पसंती दर्शवितात. त्याचप्रकारे ऑक्साईड बरोबर कवडी डिझाईनचे मोठमोठे चोकर खरेदीकडे तरुणाईचा कल वाढलेला आहे. " - श्रिजा कलेक्शन, नाशिक

"ठक्कर डोम येथे प्रसिद्ध गायक भूषण कापडे येणार आहे. यामुळे येथे गरबा तथा दांडियासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी आधीपासूनच बुकिंग सुरु झाले असून नागरिकांची गैरसोय होऊ नये याप्रमाणे नियोजन केले जाणार आहे. "

- चैतन्य बोडके, आयोजन समिती.

Navratri Clothes News
जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा मालेगावकडे; दादा भुसेंकडे नाशिकचे पालकमंत्री पद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com