
Nashik News : टोकडे येथील चोरीस गेलेल्या रस्त्यांची तक्रार थेट अण्णा हजारेंकडे!
नाशिक : मालेगाव तालुक्यातील बहुचर्चित टोकडे येथील चोरीला गेलेल्या रस्ता प्रकरणी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे धाव घेत त्यांच्याकडे तक्रार केली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी हजारे यांची भेट घेत या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना कळविण्यात यावे, असे साकडे घातले आहे. (Complaint of stolen roads in Tokade directly to Anna Hazare Nashik News)
जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांचे दावे-प्रतिदावे सुरू झाल्याने दोन्ही बाजूंकडून आता संघर्षाच्या पवित्रा स्वीकारण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी केलेल्या पाहणीत १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेला शिवरस्ता दाखविण्यात आला आहे.
हा रस्तादेखील गावांतर्गत नसून एका खासगी शेतात तयार करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. तर रस्ता अस्तित्वात असल्याचे कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे रस्त्यांचा गुंता वाढला आहे.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
हेही वाचा: Cyber Crime | बनावट मेसेजना बळी पडू नका, सायबर भामट्यांपासून सावध राहा : विजय सिंघल
दरम्यान, मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी द्यानद्यान यांची बाजू ऐकून घेत कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल आल्यानंतर सोमवारी (ता. २३) त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात मित्तल सोमवारी नसल्याने द्यानद्यान यांना अहवाल मिळू शकला नाही. दरम्यान विठोबा द्यानद्यान यांनी शनिवारी (ता.२१) राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत लेखी तक्रार केली.
यावेळी त्यांनी तक्रारीच्या त्याअनुषंगाने कारवाईपासून वाचण्यासाठी संबंधितांनी दिलेल्या खोटे दस्तऐवजाचे अवलोकन करून व संबंधित शाखा अभियंता, सहायक अभियंता व कार्यकारी अभियंतासह ग्रामसेवक यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हावे व त्यांनी कागदोपत्री रस्ता दाखवून हडप केलेली रक्कम तत्काळ शासनाच्या तिजोरीत जमा व्हावी, अशी मागणी केली.
हेही वाचा: Chandrashekhar Bawankle | नाशिक पदवीधर संदर्भात भाजप उद्या निर्णय घेणार : चंद्रशेखर बावनकुळे