Winter lifestyle : गुलाबी थंडी वाढताच बदलली लाईफस्टाईल; फिरणे अन् व्यायामाचे प्रमाण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter lifestyle

Winter lifestyle : गुलाबी थंडी वाढताच बदलली लाईफस्टाईल; फिरणे अन् व्यायामाचे प्रमाण वाढले

येवला : जिल्ह्यात हळूहळू थंडीने कडाका वाढत आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून पारा देखील घसरला आहे. गुलाबी व बोचऱ्या थंडीमुळे आता पहाटे व सायंकाळी येवला शहरासह ग्रामीण भागातच शेकोट्या पेटू लागल्या आहे. यासह आता उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. हिवाळ्यात व्यायाम करणे चांगले असल्याने पहाटे फिरणाऱ्याची संख्या वाढली आहे. थंडी सुरु होताच नागरिकांची जीवनशैली देखील बदलली आहे.

हेही वाचा: गार्ड ते पार्क ! पोरांनी केली करोडो रुपयांच्या उद्योगांची निर्मिती

मागील आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीने गारठू लागले आहेत. शहरावर सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांचा दिवस उशिराने सुरु होत आहे. वाढत्या थंडीमुळे बाजारात उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. येवला शहरातील येथील शनी पटांगण तसेच कापड बाजारात कानटोपी, मफलर, स्वेटर, जॅकेट विक्रीची दुकानेही थाटली आहेत. उबदार कपड्यांमध्येही आता फॅशनचे कपडे असून त्याला तरुणांची चांगलीच पसंती आहे. २०० रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत विविध प्रकारचे रंगबिरंगी, डिझाईनचे आकर्षक स्वेटर विक्रीसाठी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी उबदार कपड्यांच्या दरांमध्ये वाढ झाली असली तरी मागणीही कायम आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सकाळी बोचऱ्या थंडीत व्यायामाला जाणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. थंडीमुळे सुका मेव्याचे साहित्यास देखील मागणी वाढली आहे. थंडीमुळे अनेक शाळांची वेळेत १५ ते ३० मिनिटापर्यंत वाढ करून विद्यार्थ्यांना थंडीपासून आधार देण्याचा प्रयत्नही केला आहे.

हेही वाचा: Gynecomastia : जगातील एकतृतीयांश पुरुष स्तनांच्या अप्रमाणित वाढेने त्रस्त; जाणून घ्या याची कारणे

टॅग्स :NashiklifestyleWinter