Comrades Marathon : आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या 7 खेळाडूंची दमदार कामगिरी

africa comrade marathon win by nashik
africa comrade marathon win by nashik esakal

Comrades Marathon : मनात ऊर्जा असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, याची प्रचिती दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे पार पडलेल्या कॉम्बराडेस मॅरेथॉनच्या निमित्ताने आली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत नाशिकमधील सात धावपटूंनी कुठलीही शारीरिक इजा न होता, अत्यंत यशस्वीरीत्या वेळेत पूर्ण केली. (comrade marathon africa Nashik 7 Athletes Performed Strongly nashik news)

ही घटना नाशिकच्या क्रीडापटूंमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी आहे, असे गौरवोद्गार माजी नगरसेवक योगेश हिरे यांनी काढले. कॉलेज रोडवरील सलीम टी स्टॉल येथे दोस्ताना ग्रुपतर्फे या सातही धावपटूंचा माजी आमदार अनिल कदम आणि डॉ. कुणाल गुप्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विविध क्षेत्रांमध्ये काम करताना सातही खेळाडूंची भिन्न स्वरूपाची पार्श्वभूमी असतानादेखील नाशिकच्या या धावपटूंनी एकमेकांना नैतिक आधार देत शर्यत पूर्ण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

africa comrade marathon win by nashik
Nashik 11th Admission : 16 हजार विद्यार्थ्यांची पहिल्‍या फेरीसाठी नोंदणी; सहभागी विद्यार्थ्यांची संख्या कमी

त्यांच्यातील ही बाब संघभावना अधोरेखित करणारी आहे. आफ्रिकेतील कॉम्बराडेस मॅरेथॉनमध्ये सर्वश्री प्रशांत डबरी, डॉ. धनंजय डुबेरकर, डॉ. सागर पाटील, उद्योजक महेंद्र छोरीया, डॉ. पंकज भदाणे, किरण गायकवाड, संदीप हंडा आणि प्रशिक्षक अली अदमजी आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे या सात खेळाडूंपैकी प्रशांत डबरी हे ६३ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक असतानादेखील त्यांनी ही स्पर्धा अवघ्या ९ तासांत पूर्ण केली.

या कार्यक्रमात सुहास ढिकले यांचेदेखील वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोस्ताना ग्रुपचे सुधीर सातपुते, आशुतोष पाटील, मिलिंद लोहकरे, विनोद येवले, निखिल केदार आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी अनिल गुजर, डॉ. तुषार देवरे, विजय पडोळ, मनीष ओबेरॉय, मच्छिंद्र देशमुख, संजय भोकरे, नितीन गायकवाड, जितू गुळवे, दत्तू आंधळे, उदय खरे, योगेश कटारे, रवी पडोळ, शरद गांगुर्डे, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

africa comrade marathon win by nashik
Nashik News : हॉकर्स धारकांकडून महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com