Art Exhibition : संस्कृती आणि कलाविष्काराचा संगम; चित्र प्रदर्शनाला 'PNG आर्ट गॅलरी'त प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Art Exhibition

Art Exhibition : संस्कृती आणि कलाविष्काराचा संगम; चित्र प्रदर्शनाला 'PNG आर्ट गॅलरी'त प्रारंभ

नाशिक रोड : नाशिक रोड मधील 'पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी' नाशिक येथे शहरातील युवा कलावंतांच्या सामूहिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटन 'नाशिक कलानिकेतन चित्रकला महाविद्यालया'चे विश्वस्त प्रा. चित्रकार दिनकर ल. जानमाळी तसेच 'पु. ना. गाडगीळ अँड सन्स' नाशिकरोड शाखेच्या मॅनेजर प्रविणा दुसाने मॅडम यांच्या शुभहस्ते 01 मार्च 2023 रोजी करण्यात आले. (Confluence of Culture and Art Picture painting exhibition begins at PNG jewellery Art Gallery nashik news)

Artist Darshan Lavate, Nupura Joshi, Kittu More & Vaibhav Gholap

Artist Darshan Lavate, Nupura Joshi, Kittu More & Vaibhav Gholap

चित्रकार वैभव घोलप यांची प्रदर्शनातील चित्रे

चित्रकार वैभव घोलप यांची प्रदर्शनातील चित्रे

चित्रकार दर्शन लवटे यांची प्रदर्शनातील चित्रे

चित्रकार दर्शन लवटे यांची प्रदर्शनातील चित्रे

त्यांनी कलाकारांच्या चित्रांचे कौतुक केले आणि पुढील गोष्टीविषयी मार्गदर्शन केले. चित्रकार दर्शन लवटे, चित्रकार नुपुरा जोशी, चित्रकार किट्टू मोरे, चित्रकार वैभव घोलप चित्रकार प्रथमेश गायकवाड यांच्या वैविध्यपूर्ण कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश आहे.

कृष्णाची रासलिला,महाभारत तसेच दैनदिन प्रसंगावर भारतीय लघुचित्रशैलीतून अभिव्यक्त करणाऱ्या सुरेख कलाकृती, तर मधुबनी चित्रशैलीतील तरल आविष्कार, कागदकामातील सुंदर कलाकृती तर 3D शैलीतील रंगलेपणातुन विलोभनीय सौंदर्य अशा 40 हून अधिक कलाकृतीनी सजलेल्या प्रदर्शनाला बुधवारी प्रारंभ झाला. भारतीय शैली, मधुबनी शैली , 3डी कलाकृती, पेपर क्विलिंग अश्या शैलीने प्रदर्शनाचे दालन सजले आहे.

चित्रकार दर्शन लवटे यांनी जलरंग माध्यमातून 'कृष्ण रासलिला', 'नल दमयंती', 'जागरण गोंधळ', तसेच दैनदिन प्रसंगावर भारतीय लघुचित्रशैलीतून सुरेखपणे चित्रातुन अभिव्यक्तत केले आहे. यासह त्यांनी साकारलेल्या ''छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीचित्र'', राज्याभिषेक चित्र रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

चित्रकार नुपुर जोशी- भोंगे यांनीदेखिल जलरंग माध्यमातून मधुबनी शैली मधून अलंकारिक पद्धतीत विविध चित्र साकारलेली आहेत. चित्रातील रंगसंगतीचा मेळ तिने उत्तम पद्ध्तीने जमवून आणला आहे. त्यामुळे चित्र अधिक लक्षवेधी ठरतात.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

चित्रकार किट्टू मोरे यांची प्रदर्शनातील चित्रे

चित्रकार किट्टू मोरे यांची प्रदर्शनातील चित्रे

किट्टू मोरे यांनी गौतम बुद्ध, 'स्व-व्यक्तिचित्र', 'ड्रीम कॅचर' 'थ्रीडी अॅन्टिक' या कलाकृती 'पेपर क्विलिंग' पासून तयार केल्या आहेत. यासह की-चेन, कानातले दागिने अशा कलाकृतींने नजाकत आणतात.

वैभव घोलप यांच्या 3डी चित्रशैलीमुळे जिवंत चित्रणाचा भास देतात.त्यांनी हि सर्व चित्र अक्रेलिक माध्यमात कॅनवासवर साकारलेली आहेत. त्यांनी साकारलेल्या देवी देवतांचे 3डी चित्र रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सदर प्रदर्शन दि. 1 मार्च ते 5 मार्च, 2023 पर्यंत सकाळी 11 ते 8 या वेळेत 'पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी' नाशिक रोड येथे सुरू राहणार आहे. रसिकांकडुन प्रदर्शनाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे . सर्वांनी प्रदर्शनाला भेट देऊन कलाकाराच्या चित्राचा आस्वाद घ्यावा अशी विनंती कलाकारांकडून करण्यात आली आहे

चित्रकार नुपुरा जोशी यांची प्रदर्शनातील चित्रे

चित्रकार नुपुरा जोशी यांची प्रदर्शनातील चित्रे