Nashik : बिलावरून खासगी रुग्णालयात गोंधळ

Private hospital latest marathi news
Private hospital latest marathi newsesakal

नाशिक : महिलेवरील वैद्यकीय उपचाराचे बिल भरण्यावरून खासगी रुग्णालयात वाद घालून गोंधळ घातला.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार प्रतिबंध व नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान) अधिनियम, २०१० चे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Confusion in Supreme Health and Trauma Care Center Hospital over bill Nashik latest marathi news)

Private hospital latest marathi news
MSRTC कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 100 कोटी मंजूर

प्रवीण खैरे, वैशाली बनसोड व आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुषमा प्रशांत भुतडा यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा अशोक मार्ग परिसरातील आदित्यनगरमध्ये सुप्रिम हेल्थ ॲन्ड ट्रामा केअर सेंटर हॉस्पिटल आहे. सुनीता प्रवीण खैरे यांना ३० जुलैला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

औषधोपचार व वैद्यकीय खर्च असे एकत्रित ४९ हजार ८४५ रुपयांचे बिल झाले होते. संशयित प्रवीण खैरे, वैशाली बनसोड व आणखी एकाने, आम्हाला न विचारता रुग्णाला गोळ्या- औषधे दिली, जास्त बिल लावले असा आरोप केला.

त्यानंतर तिघांनी डॉ. भुतडा यांच्याशी जोरजोरात बोलून, दमदाटी करीत अंगावर धावून जात गोंधळ घातला. त्यामुळे डॉ. भुतडा यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस.पी. गेंगजे हे पुढील तपास करीत आहेत=

Private hospital latest marathi news
Nashik : पंचवटीत 2 दिवस पाणीपुरवठा बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com