नाशिक : मतदार याद्यांमधील घोळ प्रस्थापितांच्या मुळावर

voters list of nmc election
voters list of nmc election esakal

नाशिक : मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नावे स्थलांतर झाल्याने यातून प्रस्थापित लोकप्रतिनिधींच्या व्होट बॅंकेला धक्का बसण्याची निर्माण झालेली भीती हरकतींच्या माध्यमातून समोर आली. तब्बल ६२ हरकती दाखल झाल्याने छाननी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणीच्या सूचना आयुक्त रमेश जाधव (NMC commissioner Ramesh Jadhav) यांनी प्रशासनाला दिल्या, तर दुसरीकडे संकेतस्थळावर मतदार याद्या अपलोड करण्यास विलंब झाल्याने हरकती सादर करण्याची मुदत वाढवून देण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) सादर करण्यात आला. महापालिका निवडणुकीसाठी २३ जूनला प्रभागनिहाय मतदार याद्या (Voter list) जाहीर करण्यात आल्या. १ जुलैपर्यंत याद्यांवर हरकती घेण्यासाठी मुदत आहे. (confusion in voter lists of NMC general election Nashik News)

voters list of nmc election
Nashik : पावणेदोन लाखाचा गुटखा जप्त

मंगळवार (ता. २८) पर्यंत ६२ पर्यंत हरकती प्राप्त झाल्या. बहुतांश हरकती प्रभागातील मतदार अन्य प्रभागाला जोडल्या संदर्भातील आहेत. मतदारांची नावे अन्य प्रभागांना जोडली गेल्याने व संकेतस्थळावर याद्या अपलोड करण्यास विलंब झाल्याने हरकती व सूचना मांडण्यास विलंब झाल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी राजकीय पक्षाकडून करण्यात आली. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडे हरकतींसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी महापालिकेने नोंदविली आहे.

voters list of nmc election
24 तासात जैन मंदिर वणी अन् इतर ठिकाणची घरफोडी वणी पोलीसांकडुन उघड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com