Nashik : पावणेदोन लाखाचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gutkha seized by food & Drug Administration Department

Nashik : पावणेदोन लाखाचा गुटखा जप्त

जुने नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे (Department of Food and Drug Administration) सोमवारी (ता. २७) १ लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा (Gutkha) जप्त (Seized) केला. खडकाळी परिसरात एक जण प्रतिबंधात्मक अन्नपदार्थ बाळगून उभा असल्याची माहिती मिळाली असता, विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत संशयिताची चौकशी केली. त्याच्याकडे प्रतिबंधात्मक तंबाखूजन्य अन्नपदार्थ आढळून आले. (Gutka worth rs 1 lakh 78 thousand 600 seized Nashik crime News)

हेही वाचा: Nashik : देवस्थान नावाचा फास अखेर सुटला

शाहरुख नवाब पठाण (३६, रा. म्हाडा इमारत, वडाळा गाव) असे संशयिताचे नाव असून तो स्वतः विक्रेता आणि मालक असल्याचे त्याने सांगितले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांच्या तक्रारीवरून संशयित पठाण यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: नाशिक : माडसांगवीत 375 क्विंटल धान्यसाठा जप्त

Web Title: Gutka Worth Rs 1 Lakh 78 Thousand 600 Seized Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikDrugraid
go to top