Nashik: स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणावर गंडांतर; सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव रोजगारांच्या शोधात सासुरवाडीला

Tribal community during migration
Tribal community during migrationesakal

Nashik News : सुरगाणा तालुक्यातील आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असल्याने त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुरगाणा तालुक्यातील १९१ महसुली गावे आहेत. वाड्या धरल्या, तर तीनशेच्या आसपास आहेत. या सर्व गावातून स्थलांतर झाल्याचे दिसते. (Confusion over children education due to migration Tribal brothers of Surgana taluka go to Sasurwadi in search of employment Nashik)

पळसन, भोवाडा, बाऱ्हे, बर्डीपाडा, बोरगाव, ठाणगाव, जाहुले, मनखेड, पिंपळसोंड, गोंदूणे, वांगण, उंबरठाण आदी गावांत मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव करतो. त्यांचा मुख्य व्यवसाय भात शेती आहे.

मात्र, भात शेतीवर उपजीविका होत नसल्याने त्यांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. सुरगाणा तालुका त्यांचे माहेर समजले जाते, तर दिंडोरी, पिंपळगाव, निफाड, लासलगाव, नाशिक, चांदवड, पंढरपूर, सोलापूर, सातारा, सांगली, महाराष्ट्र राज्य सोडून वेगवेगळी राज्ये आदिवासींचे सासर समजले जाते.

सासुरवाडीला रोजगारासाठी झाल्याशिवाय पर्याय नसतो. काही आदिवासींच्या शेतजमिनी फॉरेस्ट प्लॉट आहेत. या जमिनीत वर्षाकाठी पाण्याअभावी एकदाच पीक घेतले जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tribal community during migration
Nashik News: सुरत-चेन्नई प्रकल्प बाधितांचे समाधान करण्यात अपयश! शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत आमदार आग्रही

यात थोडेफार धान्य उपलब्ध होत असल्याने माहेरी अपेक्षेप्रमाणे काम मिळत नसल्याने या आदिवासींना सासुरवाडीला स्थलांतर करावे लागते.

ऑगस्ट महिन्यात पाऊस पुरेसा न पडल्याने भात शेतीचे नुकसान झाल्याने येथील आदिवासींना मोलमजुरीसाठी दिंडोरी, निफाड, चांदवड, पिंपळगाव, नाशिक व गुजरातमध्ये गेले आहेत.

शासनाकडून रोजगार हमीची कामे निघाली, तर रोजगार हमीवर पगार कमी, अशी अवस्था असते. त्यामुळे नागरिकांचे या कामाकडे दुर्लक्ष होते. स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत.

बालके अंगणवाडी आहार व शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाने सुरगाणा तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा व परवडेल अशी मजुरी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Tribal community during migration
Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगगडावरील रोपवे उद्यापासून 2 दिवस बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com