Nashik News : गर्दी बाजार समितीत, फटका सामान्यांना; घोटी येथे लिलावाच्या वाहनांच्या लांबलचक रांगा

Traffic congestion on main highways due to queues of vehicles coming to the market.
Traffic congestion on main highways due to queues of vehicles coming to the market.esakal

Nashik News : घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोसह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजार समितीत येणाऱ्या वाहनांच्या रांगा शहरातील प्रमुख रस्त्यावर लागत आहेत.

यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांसह शेतकरींना करावा लागत आहे. याचा परिणाम म्हणून तीव्र उन्हामुळे वाहनचालक घामाघूम होत आहेत. बसचा खोळंबा होऊ लागल्याने प्रवासीही सैरभैर होत आहे.

रस्त्यावर शेतमालाच्या वाहनांचा खोळंबा होणार नाही यासाठी बाजार समितीने प्रभावी नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थ, प्रवासी, वाहनचालक वर्गाकडून केली जात आहे. (Congestion in market committee common people hit Long queues of auction vehicles at Ghoti Nashik News)

घोटी बाजार समिती आवारात गेल्या पंधरा दिवसांपासून भाजीपाला आवक वाढली आहे. भाजीपाला घेऊन आलेली वाहने भर रस्त्यावर थांबत असल्याने सर्वच घटक हैराण झाले आहे. या वाहनांच्या रांगा महामार्गापर्यंत लागत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

यामुळे शेतकरी वर्ग व वाहनचालकही कमालीचे त्रस्त झाले आहे. भरउन्हात वाहने रस्त्यावर उभी राहने, उन्हामुळे टोमॅटोसह अन्य पिकांचा दर्जा घसरणे, उन्हामुळे वाहनचालक व शेतकरी घामाघूम होणे यासह छोट्या वाहनांना होणारा अडथळा, बस बसस्थानकात न येता शहराबाहेर थांबत असल्याने प्रवाशांची तारांबळ होऊ लागली आहे.

बाजार समिती प्रशासन व पोलिस प्रशासनानेही संयुक्तपणे धोरण ठरवून वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Traffic congestion on main highways due to queues of vehicles coming to the market.
BJP News : बावनकुळे यांच्या कौतुकाने शहराध्यक्ष निवडीत ट्विस्ट; भाजपा बूथ सशक्तीकरण आढावा बैठक

बस थांबतात महामार्गावर

वाहनांच्या रांगांमुळे घोटी बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या बसही बाहेर थांबू लागल्या आहेत. प्रवाशांनाही महामार्गाजवळ उतरून पायी घोटीत यावे लागत आहे. बसस्थानकातील प्रवाशांनाही ओझे घेऊन दूरवर बसपर्यंत धावाधाव करावी लागत आहे.

बाजार समितीने येणाऱ्या वाहनांचे नियोजन करून त्यांना आपल्या आवारातच जागा उपलब्ध करून द्यावी किंवा लिलावाच्या वेळा ठरवून द्याव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

Traffic congestion on main highways due to queues of vehicles coming to the market.
Nashik News : अवैध गोवंश वाहतूक करणारा भरधाव पिकअप उलटला; मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com