Nashik Election : "सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणजे मतचोरी" : नाशिक काँग्रेसचा 'वोट चोर, गद्दी छोड' अभियानातून भाजपवर हल्लाबोल

Congress Accuses BJP of Manipulating Election Process : नाशिकमध्ये मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसतर्फे 'वोट चोर, गद्दी छोड' अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव ब्रिजकिशोर दत्त यांनी मतचोरीचा आरोप केला.
Congress Protests

Congress Protests

sakal 

Updated on

नाशिक: स्वातंत्र्यानंतर देशात झालेला सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणजे मतचोरी आहे. भाजपने सत्तेचा वापर करून निवडणूक आयोगाला आपले बाहुले बनवले आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सत्ताधारी या देशातील कोट्यवधी लोकांची मते चोरण्याचे काम करत आहेत. यामुळे लोकशाही संकटात आली असून, आता जनतेने रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांच्या लढ्याला साथ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि शहराचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांनी आज केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com