Nashik : तिरुपती, पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू केली जाणार

Spice jet latest marathi news
Spice jet latest marathi newsesakal

नाशिक : स्पाइस जेट (Spice jet) कंपनीने नाशिकहून सेवेचा विस्तार करताना दक्षिण भारतातील प्रसिद्ध देवस्थान तिरुपतीसाठी (Tirupati) कनेक्टिंग सेवा सुरू केली आहे.

त्याचबरोबर तमिळनाडूला लागून असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठीदेखील हैदराबाद येथून कनेक्टिंग विमानसेवा सुरू केली जाणार आहे. (Connecting airlines of spicejet will be launched for Tirupati Puducherry Nashik latest marathi News)

उडान योजनेअंतर्गत स्पाइस जेट कंपनीने नाशिकच्या ओझर विमानतळावरून दिल्ली, हैदराबाद, गोवा, बंगलोर, अहमदाबाद सेवेसाठी नोंदणी केली आहे. परंतु, कोरोना पार्श्वभूमीवर सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर मात्र सेवा सुरळीत होणे अपेक्षित होते.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पाइस जेट कंपनीला तिसऱ्यांदा अल्टिमेटम दिल्यानंतर कंपनीने २२ जुलैपासून नाशिक ते हैदराबाद व ४ ऑगस्टपासून नाशिक ते दिल्ली विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाइन बुकिंगदेखील सुरू झाले आहे. ओझर विमानतळावरून सध्या अलायन्स एअर कंपनीमार्फत अहमदाबाद, पुणे, बंगलोर, नवी दिल्ली व बेळगाव अशी होपिंग फ्लाइट सेवा सुरू आहे. हैदराबाद, दिल्लीसाठी बुकिंग सुरू झाले आहे.

हैदराबादसाठी तीन हजार सातशे, तर दिल्लीसाठी सहा हजार १०९ रुपये दर निश्चित आहे. हैदराबादसाठी रविवार ते शुक्रवार, असे सहा दिवस, तर नवी दिल्लीसाठी दररोज सेवा सुरू राहणार आहे. हैदराबादसाठी सुरू होणाऱ्या विमानाची प्रवासी क्षमता ८० आहे तर दिल्लीसाठी १९० असणे विमान राहील.

Spice jet latest marathi news
Nashik : स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळले

हैदराबादहून दररोज उड्डाण

हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ओझर (नाशिक) साठी उड्डाण होईल. नाशिकला सकाळी ७. ५० वाजता पोचेल. नाशिकहून सकाळी ८.१० वाजता हैदराबादसाठी उड्डाण होईल. ९.४० वाजता पोचेल.

हैदराबाद विमानतळावरून तिरुपतीसाठी कनेक्टिंग सेवा राहील. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी तिरुपतीसाठी उड्डाण होईल, ही सेवा दररोज राहणार आहे. त्याचप्रमाणे पुद्दचेरीसाठी हैदराबाद विमानतळावरून एक वाजून दहा मिनिटांनी दररोज उड्डाण होईल.

नाशिकसाठी दिल्लीहून संध्याकाळी पाच वाजता उड्डाण होईल. संध्याकाळी ६. ५० वाजता ओझर विमानतळावर पोचेल. संध्याकाळी ७.२० वाजता दिल्लीकडे उड्डाण होईल व रात्री ९.२० वाजता दिल्लीत पोचेल, अशी माहिती आयमाच्या एव्हिएशन कमिटीचे प्रमुख मनीष रावल यांनी दिली.

Spice jet latest marathi news
Nashik : देश, परदेशातील समर्थ केंद्रावर गुरुपौर्णिमेचा अमाप उत्साह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com