Nashik : देश, परदेशातील समर्थ केंद्रावर गुरुपौर्णिमेचा अमाप उत्साह | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Annasaheb More in swami samarth kendra latest marathi news

Nashik : देश, परदेशातील समर्थ केंद्रावर गुरुपौर्णिमेचा अमाप उत्साह

नाशिक : दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह राज्यभरात, देशात आणि परदेशातीलही समर्थ केंद्रामध्ये आज अमाप उत्साहात, मंगलमय, भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा (Guru Pournima) उत्सव साजरा करण्यात आला.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या दिंडोरी प्रधान केंद्रात गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांचे उपस्थितीत हा दिवसभराचा मंगलमय सोहळा संपन्न झाला.विशेषतः दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर येथे दिवसभर मुसळधार पाऊस सुरु असुनही सेवेकरी, भाविकांच्या उत्साहात कुठेही कमतरता दिसून आली नाही. (Enormous enthusiasm for Gurupournima at swami Samarth Kendras country and abroad Nashik Latest Marathi News)

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गांतर्गत आज जगभर हजारो समर्थ केंद्र सक्रिय असून लाखो,करोडो सेवेकऱ्यांच्या दृष्टीने गुरुपौर्णिमा सोहळ्यास अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच या पावन दिवसाची सर्व आतुरतेने वाट पाहत असतात.

आषाढी पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमादिनी गुरुपूजन करण्याची पवित्र प्रथा भारतभर असल्यामुळे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखोंची पावलं दिंडोरी, त्र्यंबकसह सर्व समर्थ केंद्राकडे वळतात.

एकाच दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी येऊन गर्दी करू नये म्हणून यावर्षी शनिवार दिनांक 9 जुलै पासूनच सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला . उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असे विभागवार येऊन रोज गुरुपूजन करून या मंगलमय सोहळ्यात आता पर्यंत लाखो भाविक, सेवेकरी, वारकऱ्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा: Nashik Rain Update : हत्ती नदीवरील पूलच गेला वाहून

मुसळधार पावसातही हजारोनी केले गुरुपूजन.

मुसळधार पावसातही हजारोनी केले गुरुपूजन.

आज भल्या पहाटेपासून सर्व केंद्रात लगबग दिसत होती. सकाळी सहा वाजता गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी केंद्रात गुरूपादुका पूजन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे षडशोपचार पूजन केले. भूपाळी आरती आणि नैवद्य आरतीची सेवा सर्व सेवेकऱ्यांनी रुजू केली.

या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिंडोरी व त्र्यंबक मध्ये देशभरातून सेवेकरी विक्रमी संख्येने आले होते. मागील दोन वर्ष करोना महामारीमुळे मर्यादित स्वरूपात उत्सव साजरा झाल्याने आज पहाटे पासून मोठया प्रमाणात गर्दी झाली.

गर्दी झाली तरी सर्व सोहळा शिस्तीत पार पडला. अबालवृद्ध सेवेकरी शांततेत रांगेत येऊन श्री स्वामी समर्थ महाराज मूर्तीला अभिषेक करून, पुष्प अर्पण करून चरणतीर्थ घेऊन समर्थाना विनंती करत होते, "महाराज आपणच माझे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. माझा सांभाळ करा." सर्वत्र महिला पुरुष सेवेकऱ्यांनी केंद्रात व आपापल्या घरी आज श्री स्वामी चरित्र सारामृत, तेजोनिधी या ग्रंथाची पारायण केले.

आजचा सोहळा गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू, केरळ या राज्यात आणि नेपाळ, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई,ओमानमधील समर्थ केंद्रात सुद्धा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

दिंडोरीत गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबक मध्ये चंद्रकांतदादा मोरे यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले.सेवामार्गाचे जगभरातील कार्य आणि भविष्यातील नियोजन याबाबत विस्तृत चर्चा करून समर्थसेवा घराघरात पोचवण्यासाठी आपण सर्वांनी अहोरात्र झटायचं आहे, असे आवाहनही केले.

हेही वाचा: Corona Update : ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण 450 प्लस; 100 पॉझिटिव्‍ह

Web Title: Enormous Enthusiasm For Gurupournima At Swami Samarth Kendras Country And Abroad Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..