Nashik News : दिंडोरीतील 750 वर्षांपूर्वीच्या त्रिनेत्र गणेशमूर्तीचे संवर्धन; मूर्तीला आतून बळकटी

Trinetra Ganapati idol preserved at Dindori
Trinetra Ganapati idol preserved at Dindoriesakal

नाशिक : दिंडोरी येथील कृष्णकर लक्ष्मण पुराणिक यांच्या मंदिरातील चल स्वरूपातील त्रिनेत्र गणेशमूर्तीचे संवर्धन मिट्टी फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. मूर्ती सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वीची आहे.

मूर्तीची झीज झाली होती. झीज संथ करण्यासाठी मूर्तीला आतून बळकटी देण्यात आली आहे. पुराणिक-भट परिवारातील गणेशमूर्तीची देखभाल करणारी आठवी पिढी आहे. (Conservation of 750 year old three eyed Ganesha idol in Dindori Strengthen idol from within Nashik News)

सभोवतीची आद्रता, धूलिकण, पाणी व आम्ल यांचा थेट होणारा संपर्क आणि परिणाम, प्रदूषणामुळे मूर्तीची झीज झाली होती. या मूर्तीच्या संवर्धनाचे काम पहिल्यांदा करण्यात आले. मात्र त्यासाठी कृत्रिम पदार्थांचे लेपण न करता रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली.

मात्र संपूर्ण प्रक्रियेत एम-सील, एरल्डाईट अथवा तत्सम रासायनिकचा वापर केलेला नाही. मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊन पक्केपणा देणाऱ्या रसायनांचा वापर करून व त्यामधील ‘गॅस्ट्रिक क्रीएशन’ संथ होऊन मूर्तीला अधिक बळकटी देण्यात आली. हे काम सोळा दिवस चालले होते.

दुर्मीळ त्रिनेत्र गणेशमूर्तीचे संवर्धन करणे व भविष्यासाठी त्या मूर्तीची झीज थांबवणे, यासाठी आम्ही पुराणिक कुटुंबीय कायम आग्रही होतो. हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोचावा म्हणून संवर्धनाचा निर्णय घेतला. मिट्टी फाउंडेशनने याकामी सहकार्य केले, असे कृष्णकर पुराणिक यांनी सांगितले.

Trinetra Ganapati idol preserved at Dindori
Jindal Fire Accident : पहिल्या दिवशी उत्पादन बंद; तिसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे!

सिद्धिदायक दैवत असा लौकिक

त्रिनेत्र गणपती हे सिद्धिदायक दैवत म्हणून मूर्तीचा लौकिक आहे. सुलभासनात बसलेल्या अवस्थेतील मूर्ती आहे. ब्रिटिश काळातील अनेक दस्तऐवजांमध्ये या मूर्ती व मंदिराचा उल्लेख आढळतो, असे सांगून मिट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर मोरे म्हणाले, की

मूर्तीच्या हातातील आयुधांमध्ये अनुक्रमे कंठमाला, परशू, मोदक आणि कमंडलूचा समावेश आहे. संवर्धनाच्या कामात फाउंडेशनच्या हर्षद, ओंकार, शांताराम मोरे यांचा सहभाग राहिला.

"शहर व जिल्ह्यातील प्राचीन धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेले मूर्ती व मंदिराचे संवर्धन होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या मंदिरात मूर्तीबाबत माहिती असेल अथवा संवर्धनासाठी मदत हवी असेल, तर मिट्टी फाउंडेशनच्या माध्यमातून योग्य ती मदत केली जाईल."

- मयूर मोरे (अध्यक्ष, मिट्टी फाउंडेशन)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Trinetra Ganapati idol preserved at Dindori
Police Peace Committee : शांतता समितींमध्ये मिळणार युवकांना संधी; पोलिस आयुक्तांची संकल्पना

गणपती स्त्रोत्र

तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।

विष्णू शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥

तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।

सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥

मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।

देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥

माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे ।

संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥

गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।

मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥

Trinetra Ganapati idol preserved at Dindori
Nashik News : ZPतर्फे लाभार्थ्यांना 700 सायकली, 80 चारचाकी वाहने दादा भुसेंच्या हस्ते वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com