नाशिकमध्ये घरांच्या किमती वाढणार...? ही आहेत कारणे

construction materials price increase house is expensive in nashik
construction materials price increase house is expensive in nashikesakal
Updated on

नाशिक : बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये घरांच्या किमती वाढविण्याचा निर्णय बांधकाम संघटनांनी घेतल्यानंतर नाशिकमध्येदेखील जवळपास दहा टक्क्यांनी घराच्या किमती वाढणार आहे. वाढत्या साहित्याच्या अनुषंगाने हा निर्णय अपरिहार्य असल्याची माहिती क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली. (Latest Marathi News)

२०२० व २०२१ या वर्षात कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्याचा सर्वाधिक परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर दिसून आले. घरांना मागणी घटल्याने गृह कर्जाचे प्रमाण घटले. त्यानंतर दोन ते अडीच टक्क्यांनी गृह कर्जाचे दर खाली आले. एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अधिक एफएसआय देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू झाले. गृहकर्जाचे कमी झालेले दर, बांधकाम प्रकल्पांचा विस्तारामुळे व्यवसायात तेजी निर्माण झाली. परंतु, बांधकाम साहित्याचे दर सातत्याने वाढत असल्याने तेजीचे रूपांतर मंदीत होण्यास सुरवात झाली आहे. बांधकाम साहित्यामध्ये ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने घरांच्या किमती वाढविणे अपरिहार्य झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्राधिकरण क्षेत्रामध्ये घरांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशीच स्थिती नाशिकमध्येदेखील असल्याने जवळपास दहा टक्क्यांनी गृह खरेदीच्या किमती वाढण्याचे संकेत देण्यात आले आहे.

construction materials price increase house is expensive in nashik
आजीचा बटवा: पोटाचा घेर कमी करायचा आहे मग आजीच्या बटव्यातला जिऱ्याचा करा उपयोग

दरवाढ कायम असल्याने निर्णय

क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांची यापूर्वी बैठक घेऊन घरांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सरसकट सर्वच बांधकाम व्यावसायिकांनी दरवाढ केली नाही. मात्र, बांधकाम साहित्यातील दरवाढ कायम असल्याने व राज्यातील इतर शहरांमध्येदेखील घरांच्या किमती वाढविण्यात आल्याने नाशिकमध्ये देखील किमती वाढविल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे आहेत सध्याचे बांधकाम साहित्याचे दर

- स्टील - ७८ रुपये किलो.

- वीट- ९ ते १२ हजार रुपये ( प्रती हजार)

- सिमेंट- ३७५ ते ४५० प्रती गोणी.

- रेडीमिक्स कॉन्क्रीट (आरएमसी) ५६०० रुपये क्युबिक मीटर.

- आर्टिफिशिअल सॅण्ड, प्लंबिंग मटेरिअल, टाइल्स, ॲल्युमिनिअम, रंग, इलेक्ट्रिकल वस्तु, जीआय पाइप, केबल- २५ ते ३० टक्के वाढ.

construction materials price increase house is expensive in nashik
Vastu Tips: तुमच्या घरातील अनेक वास्तूदोष दूर करण्याच काम करते तुरटी...

''बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने घरांच्या किमतींमध्येदेखील वाढ करणे अपरिहार्य आहे. मुंबई, पुणे या शहरांमध्ये बांधकाम साहित्य दरवाढीची झळ फारशी बसत नाही, मात्र नाशिकमध्ये किंचित दरवाढदेखील परिणामकारक ठरते.'' - रवी महाजन, अध्यक्ष, नाशिक क्रेडाई मेट्रो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com