kumbh mela
kumbh melaesakal

Nashik Simhasta Kumbh Mela: शहरातून नव्याने 21 पुलाची निर्मिती! सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू

Published on

Nashik Simhasta Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. बांधकाम विभागाने शहरातून वाहणाऱ्या नद्यांवर २१ पूल बांधण्याचे निश्चित केले आहे.

यातील काही पूल अस्तित्वात असलेल्या पुलांच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने उभारले जाणार आहे.

२०२७ व २८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाला विकास आराखडा सादर करावा लागणार आहे. (Construction of 21 new bridges from city Preparations for Simhastha Kumbh Mela underway pwd nashik)

महापालिकेच्या जवळपास ४२ विभागाकडून कुंभमेळ्यासाठी विकास आराखडा मागविण्यात आला आहे. कुंभमेळ्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आहे.

त्यांच्याकडे सर्व विभागांना आराखडा सादर करावा लागणार आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत सिंहस्थ कालावधीमध्ये सर्वाधिक कामे होणार आहे. त्याअनुषंगाने बांधकाम विभागाचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

बांधकाम आराखड्यामध्ये शहरात बाह्य रिंगरोड उभारणी महत्त्वाचा विषय असला तरी बाह्य रिंगरोड राज्य शासनाच्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

त्यामुळे महापालिकेला अन्य कामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने शहरातील गोदावरी, नंदिनी व वालदेवी नद्यांवर पूल उभारण्याचा प्रस्ताव बांधकाम आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

kumbh mela
Dragon Fruit Cultivation: व्हीएतनामच्या धर्तीवर कसमादेत ड्रगन फ्रूटची शेती! राज्यातील शेतकऱ्यांकडून दौरा

पूल उभारण्यासाठी जवळपास २८५ कोटी रुपये अपेक्षित असल्याचा प्रस्ताव आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. गोदावरी नदीवर ९, नंदिनी नदीवर ७, वाघाडी नदीवर ४, तर वालदेवी नदीवर १ असे एकूण २१ पूल उभारण्याचा समावेश आराखड्यामध्ये करण्यात आला आहे.

येथे होणार नवीन पूल

- गोदावरी नदी : तपोवन एसटीपी, दसक गाव, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ, टाळकुटेश्वर फुलाजवळ, संत गाडगे महाराज पूल, रामसेतू पूल, रामवाडी पूल, कुसुमाग्रज उद्यानाजवळ, फॉरेस्ट नर्सरी पूल.

- नंदिनी नदी : भारतनगर, पखाल रोड, चिल्ड्रन पार्क, मिलिंदनगर (प्रत्येकी एक व दोन), सिटी सेंटर मॉल, दोंदे पूल. (अस्तित्वात असलेल्या पुलाजवळ नवीन पूल)

अरुणा नदी : राजमाता मंगल कार्यालय समोर, गुंजाळबाबानगर, पोकार कॉलनी, म्हसरूळ गाव.

- वालदेवी नदी : वडनेर.

kumbh mela
Nashik BJP News: शहर भाजप कार्यकारिणीत ‘परिवारवाद’! निवडणुकीच्या तोंडावर असंतोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com