दुषित पाण्यामुळे नाशिककरांच आरोग्य धोक्यात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drinking water

दुषित पाण्यामुळे नाशिककरांच आरोग्य धोक्यात...

नाशिक रोड : गौळाणे गावाजवळ नाशिक महापालिकेचा खत प्रकल्प आहे. या खत प्रल्पातील दुषित पाणी (Contaminated water) वालदेवी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे गौळाणे व आजुबाजुच्या खेडे गावात विहिरींमध्ये केमिकलयुक्त दुषित पाणी उतरत आहे. या पाण्यामुळे गौळाणे, पाथर्डी, पिंपळगाव, दाढेगाव, वडनेर, विहीतगांव या गावातील नदी जवळील विहिरींत हे पाणी उतरते आणि हेच पाणी शेतीला वापरले जात असल्याने पिकांना पाणी देतांना शेतकऱ्यांच्या हाता- पायांंना जखमा होतात. याच विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते त्यामुळे परिसरात रोगराई देखील पसरत आहे.

चेहेडी येथे दारणा व वालदेवी नदीचा संगम आहे. हेच पाणी संगमावर असलेल्या महापालिकेच्या साठवण बंधाऱ्यात मिसळले जाते. या बंधारामधून या दुषित पाण्याचा पुरवठा नाशिकरोडला देखील होत आहे.

विहीतगाव, वडनेर, पिंपळगाव ह्या गावांना गावात महापालिकेच्या जलवाहिनी व्दारे पिण्याचे पाणी येते परंतु शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरीचे दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. गौळाणे गावाला दुसरी पाण्याची सोय नसल्याने त्यांनाही या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागतो, त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्याचे धोक्यात आले आहे.

हेही वाचा: कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर पॅरासिटॅमोलची गरज नाही - भारत बायोटेक

या परिसरातील शेतकऱ्यांचा शेती बरोबरच दुधाचासुद्धा व्यवसाय आहे. शेतीमध्ये पिकविलेला माल बाजार समिती नेला तर दुषित पाण्याचा माल म्हणुन व्यापारी घेत नाहीत, तसेच येथील शेतकरी जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करतात. म्हशींना हे दुषित पाणी पाजावे लागत, त्यामुळे त्याचा परिणाम दुधावर होत आहे. हे दुध नाशिक शहरात विकले जाते त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे.

हेही वाचा: जिवंत पत्नीचा बनविला मृत्यूचा दाखला

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top