नाशिक : औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगार १ डिसेंबरपासून संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 thermal power station nashik

औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगार १ डिसेंबरपासून संपावर

sakal_logo
By
निलेश छाजेड

एकलहरे (जि. नाशिक) : येथील औष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना पगारवाढीचा फरक व नवीन वेतन श्रेणीप्रमाणे पगार मिळत नसल्यामुळे येत्या १ डिसेंबरपासून कंत्राटी कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. महानिर्मिती कंपनीच्या नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे येथे मोठया प्रमाणात कंत्राटी कामगार काम करत असून, कामगारांना गेल्या दहा वर्षातील वेतन वाढीतील फरक, २० टक्के पगारवाढ अद्यापही मिळालेली नाही.

१ जानेवारी २०२० पासून वेतनवाढ झाली नाही. व्यवस्थापनाबरोबर संघटनेच्या वारंवार बैठका होवूनही व्यवस्थापनाने कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून येत्या १ डिसेंबरपासून कंत्राटी कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर संघटना सर्वतोपरी काळजी घेऊन संप यशस्वी करेल, तसेच संपकाळात औद्योगिक शांतता व कायदा सुव्यवस्था भंग झाल्यास सर्वस्वी येथील स्थानिक व्यवस्थापन जबाबदार असेल असे कामगारांनी म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक | दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

व्यवस्थापनाबरोबर वारंवार चर्चा करूनही न्याय मिळाला नसल्याने नाइलाजाने संप करावा लागत आहे.
- पवन पवार, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना

कंत्राटी कामगारांच्या भावना व्यवस्थापनाने विचारात घ्यायला हव्या होत्या. परंतु, व्यवस्थापन व कंत्राटदार यांचे हितसंबंध असल्याने न्याय मिळत नाही. त्यामुळे संप करावा लागत आहे. संप १०० टक्के यशस्वी करू व न्याय मिळवू.
- महेशकुमार देशमुख, सचिव, वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना

हेही वाचा: 'मिया भाई' फेम रॅपरने सोडली म्युझिक इंडस्ट्री, म्हणाला इस्लाममध्ये..

loading image
go to top