Latest Marathi News |नियतीने हिरावलेल्या मित्राच्या मदतीसाठी सरसावले ठेकेदार मित्रांचे हात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Help of six lakhs was given to the Devendra Shinde's family at Jalgaon Neur

नियतीने हिरावलेल्या मित्राच्या मदतीसाठी सरसावले ठेकेदार मित्रांचे हात!

येवला (जि. नाशिक) : दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा… या काव्यपंक्तीची आठवण यावी असा माणुसकीचा झरा पाझरणारा प्रकार घडला आहे तो जळगाव नेऊर येथे...क्रूर नियतीने घाला घातला आणि सुस्वभावी मित्र अचानक सर्वांना सोडून गेला. त्याचे कुटुंब उघडयावर आले...याची मनाला सल लागल्याने ठेकेदार मित्रांनी उघड्यावर आलेल्या मित्राच्या कुटुंबीयांना सहा लाखावर रुपयांची मदत करून आधार दिला आहे. (contractor friends reached out to help dead friends family Nashik Latest Marathi News)

येथील जिल्हा बँकेचे बँक अधिकारी राजेंद्र शिंदे यांचे बंधू असलेले देवेंद्र (बंडू) शिंदे या ठेकेदाराचा मागील आठवड्यात आजारपणाने मृत्यू झाला.त्याच्या पश्चात कुटुंब उघड्यावर पडू नये,या हेतूने सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेतील ठेकेदारानी एकत्रित येत शिंदे यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी मंगळवारी (दि. १३) जमा केलेला ६ लाख ५७ हजार ७०० रुपयांचा धनादेश शिंदे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात करत समाजापुढे आदर्श उभा केला आहे.

तालुक्यातील जळगाव नेऊर येथील ठेकेदार देवेंद्र शिंदे यांना जानेवारी २०२१ मध्ये फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना कुटुंबाने दवाखाना केला. यात लाखो रुपये खर्ची झाले. मात्र, शिंदे यांचे प्राण वाचू शकले नाही. ४ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला.

आपला एक सहकारी ठेकेदार गेल्याचे शल्य ठेकेदारांना होती. यासाठी ठेकेदारांनी एकत्र येत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेकेदारांनी एकमेकास आवाहन केले, अवघ्या दहा दिवसांत सहा लाख ५७ हजार रुपयांचा निधी जमा झाला. तब्बल १६० ठेकेदारांनी आपापल्या परीने मदतीचा हात मित्राला दिला.

हेही वाचा: कोठार येथे निर्माल्य संकलन मोहीम; तब्बल पावणे 2 क्विंटल निर्माल्याचे संकलन

जमा झालेल्या निधीचा धनादेश मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला.याकामी प्रामुख्याने मकरंद सोनवणे, प्रकाश बनकर,हरपलसिंग भल्ला, नितीन गायकवाड,श्री.ठोंबरे, पी.के. काळे, सुनील कांदे, विजय घुगे,शिवाजी घुगे,संदीप दरगोडे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, अनिल दारूंटे,सुनील पैठणकर, अविनाश गाडे,भाऊसाहेब धनगर,अनिल आव्हाड, नितीन आहेर,विठ्ठलराव आठशेरे, राहुल परदेशी, शशी आव्हाड,आर.टी.शिंदे, किशोर खोड,भाऊसाहेब सांगळे,संजय अव्य,चंद्रशेखर डांगे, रामनाथ कुटे,राजाराम कुऱ्हाडे,वसंत पवार, मुन्ना पाटील, एल.टी. पवार, दत्ता थोरात, प्रमोद बोडके,योगेश गंडाळ, रवी जगताप, मनोहर जावळे,दिनेश आव्हाड आदी जिल्हाभरातून १५८ बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी मदत केली. ही मदत कुटुंबासाठी आधारवड ठरणार असून कुटुंबीयांना भविष्यात उभे राहण्यासाठी मोठा आधार मित्रांनी दिला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असल्याची प्रतिक्रिया त्यांचे बंधू राजू शेलार यांनी दिली आहे.

हेही वाचा: Nashik : ऊर्ध्व गोदावरीतून 74 हजार हेक्टरांत सिंचन

Web Title: Contractor Friends Reached Out To Help Dead Friends Family Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..