Nashik : ऊर्ध्व गोदावरीतून 74 हजार हेक्टरांत सिंचन

Irrigation latest marathi news
Irrigation latest marathi newsesakal

नाशिक : वाघाड धरण व कालवे, करंजवण धरण व कालवे, पालखेड धरण व कालवे, ओझरखेड धरण व कालवा, पुणेगाव धरण व कालवा, तिसगाव धरण, दरसवाडी पोचकालवा, मांजरपाडा वळण योजना, ११ प्रवाही वळण योजना अशा या ऊर्ध्व गोदावरी संयुक्त प्रकल्पास सोमवारी (ता. १२) एक हजार ४९८ कोटी ६१ लाख रुपयांची चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

या प्रकल्पातून ५०.७१३ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार असून, सिंचनासाठीही सुविधा होणार असल्याने सुमारे ७४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. दरम्यान, १९ जुलै १९६६ च्या शासन निर्णयानुसार १९६४-६५ च्या दरसूचीनुसार या प्रकल्पाच्या १४ कोटी २९ लाख रुपयांच्या कामांना मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. (Irrigation of 74000 hectares from urdhva Godavari Nashik Latest Marathi News)

या प्रकल्पांतर्गत १९७८ मध्ये वाघाड, १९७४ मध्ये करंजवण, १९७९ मध्ये पालखेड, १९८५ मध्ये ओझरखेड, २००१ मध्ये पुणेगाव, तर १९९९ मध्ये तिसगाव धरण पूर्ण झाले. दरसवाडी पोचकालव्याचे काम प्रगतिपथावर आहे. मांजरपाडा वळण योजनेचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. शिवाय ११ प्रवाही वळण योजनांपैकी सात वळण योजनांचे काम पूर्ण झाले असून, गोळशी-महाजे, ननाशी, धोंडाळपाडा, पायरपाडा या चार वळण योजना प्रगतिपथावर आहेत.

सिंचन क्षमता वाढणार

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ हजार २१० हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाची व्यवस्था होणार आहे. वाघाडअंतर्गत सहा हजार ७५०, करंजवणअंतर्गत एक हजार ५७४, पालखेडअंतर्गत ४४ हजार १७० हेक्टरची सिंचन व्यवस्था पूर्ण झाली आहे. जूनअखेर ओझरखेडअंतर्गत १३ हजार पाच, तिसगावअंतर्गत एक हजार ७२७ अशी एकूण १४ हजार ४५०, तर पुणेगावअंतर्गत सहा हजार ९८४ पैकी चार हजार ६०८ हेक्टरसाठी सिंचन व्यवस्था झाली आहे.

एक हजार ४०९ हेक्टर इतकी अप्रत्यक्ष सिंचनाची व्यवस्था होणाऱ्या दरसवाडी पोचकालव्यातून जानेवारीअखेर अप्रत्यक्ष ४६४ हेक्टर सिंचन पूर्ण झाले. मांजरपाडा आणि इतर ११ प्रवाही वळण योजनांसाठी स्वतःचे सिंचन क्षेत्र नाही. मात्र ३६.५२ दशलक्ष घनमीटर पाणी वळविण्यात येणार आहे.

Irrigation latest marathi news
कोठार येथे निर्माल्य संकलन मोहीम; तब्बल पावणे 2 क्विंटल निर्माल्याचे संकलन

प्रकल्पाच्या ठळक नोंदी

० प्रकल्प पूर्णत्वातून सकल राष्ट्रीय उत्पन्नात पडणार भर.

० ५०.७१३ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार.

० ७.४४ दशलक्ष घनमीटर पाणी लहान-मोठ्या उद्योगांना पुरविणार.

० देवसाने (मांजरपाडा) योजनेतून १७.१६ दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी खोऱ्यासाठी मिळणार.

० वळण योजना २०२३ पर्यंत पूर्ण होणार.

० चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे तीन हजार १३८ हेक्टर सिंचनाची होणार व्यवस्था.

० प्रकल्पाचे लाभव्य गुणोत्तर ३.७५ असेल.

वळण योजनांची माहिती

- कळमुस्ते प्रवाही वळण योजना-दमणगंगा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवणे ः ३६४ कोटी रुपये (योजनेचे काम सुरू होईल.)

- चिमणपाडा प्रवाही वळण योजना ः २६ कोटी ३० लाख रुपये

- अंबड (ता. दिंडोरी) प्रवाही वळण योजना ः १० कोटी ५३ लाख रुपये

- कापवाडी (ता. इगतपुरी) प्रवाही वळण योजना ः २५८ कोटी ४८ लाख रुपये

- किकवी पेयजल प्रकल्प ब्राह्मणवाडे ः काम सुरू करण्यापूर्वी वन विभागाला ३६ कोटी ५७ लाख रुपये द्यावे लागणार. अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद

Irrigation latest marathi news
Dhule Crime : म्हसदीतील 2 दुकानांमध्ये चोरी; लाखोचा ऐवज लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com