esakal | भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग
sakal

बोलून बातमी शोधा

surekha khairnar.jpg

कुठलेही प्रशिक्षण नाही की वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव नाही. त्यांच्या सुख-दु:खाची आरोग्याची काळजी घेणारी गावाची "ताई.' केवळ सर्वेक्षणाची जबाबदारी न उचलता आपल्या गावात, वॉर्डात, प्रभागतील येणाऱ्या प्रत्येक समस्येला जिवाची पर्वा न करता सामोरे जाणारी आशासेविका. प्रसूती करणे खरंतर डॉक्‍टरांचे काम, मात्र अनेकदा आणीबाणीची वेळ येते. 

भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग

sakal_logo
By
गायत्री जेऊघाले : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शासन म्हणते दाईकडून प्रसूती नको...नजीकच्या रुग्णालयात न्या, वेळेवर शासकीय वाहन नाही, डॉक्‍टरांकडून जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला, रिस्क कोण घेणार? असा डॉक्‍टरांकडूनच उपदेश... अशा स्थितीत तीन महिन्यांत या ताईंनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करत अनुभवाच्या जोरावर आपल्या भगिनींची प्रसूती सुखरूपपणे करीत आपल्या सेवाकार्याला एक नवा आयाम दिला आहे. 

...अन्‌ "त्या' मातेची प्रसूती
 
मोहाडी येथील माया घोलप म्हणाल्या, की एका गरोदर महिलेची प्रसूती करण्याची जबाबदारी येऊन ठेपली. मुळातच गर्भवती महिलेत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने अनेक समस्या उभ्या राहिल्या. त्या गर्भवती महिलेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण केवळ सात टक्के होते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी त्या महिलेल्या तालुका रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र तिथे गेल्यानंतर त्या महिलेला प्रसूतीसाठी आत घेतले जात नव्हते. गर्भवतीचे हिमोग्लोबिन कमी असल्याने तालुका रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी आम्हाला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र गर्भवती महिलेल्या शासकीय रुग्णालयात नेईपर्यंत बराच उशीर झाला असता. यातून गर्भाला हानी होण्याचीही भीती होती. त्यामुळे आम्ही तालुका रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे त्या मातेच्या प्रसूतीचा तगदा लावला आणि त्या मातेची प्रसूती केली. 

पॉलिहाउसमध्ये चिमुकलीचा जन्म
 
नामपूर येथील सुरेखा खैरनार म्हणाल्या, की डॉक्‍टर कोरोनाग्रस्त असल्याने गावातील ग्रामीण रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्र होते. अशावेळी अगोदर कोणत्याही अनुभव नसतानाही लॉकडाउनच्या तीन महिन्यांच्या काळात मी तीन महिलांची प्रसूती केली. त्या महिलांची खासगी रुग्णालयात जाण्याची आर्थिक स्थिती नव्हती. पोटाची खळगी भरण्यासाठी नामपूरला आलेल्या बिहारी महिलेला प्रसूतीच्या तारखेच्या पंधरा दिवस आधीच प्रसूती कळा सुरू झाल्या. ती महिला रोजच्या कामासाठी गेली असता अचानक तिला कळा सुरू झाल्या. ग्रामीण रुग्णालय प्रतिबंधित असल्याने प्रसूतीसाठी मला फोन आला. माझ्याकडे त्या महिलेची नोंद होती. परंतु प्रसूतीची तारीख नसल्याने मी कोणत्याही तयारीविना गेले.

हेही वाचा > धक्कादायक! बायकोच्या चारित्र्यावर संशय...नवऱ्यानेच मारण्याची दिली सुपारी..अन् मग

तिथे गेल्यानंतर महिलेची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने मी स्वतः तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. प्रसूती किटविना त्या महिलेची पॉलिहाउसमध्ये प्रसुती केली. प्रसूती किट तर दूरच माझ्याकडे हॅंड ग्लोव्हजदेखील नव्हते. तरीही त्या महिलेची सुखरुप प्रसूती झाली. त्या महिलेला एक गोंडस मुलगी झाली. प्रसूतीनंतर बाळाची नाळ कशी कापावी हे माहीत नव्हते. परंतु त्याचीही योग्य माहिती घेऊन नाळ कापली. महिलेची अतिशय सुखरूप प्रसूती झाल्यानंतर हायसे वाटले.  

हेही वाचा > धक्कादायक! डोक्यावरचं कर्ज फेडायचं कसं?...जीवाची होत होती घुसमट...अन् घेतला अखेरचा निर्णय

loading image
go to top