Nashik News: सेतू अभ्यासक्रम निर्मितीत जिल्ह्यातील शिक्षकांचे योगदान!

मागील इयत्तासह पुढील अभ्यासक्रमांची होणार पूर्वतयारी
Teachers
Teachersesakal

: सेतू अभ्यासक्रम निर्मिती व पाठ्यक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातील पाच शिक्षकांनी योगदान दिले आहे. (contribution of teachers in district in creation of Setu curriculum Nashik News)

इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत सेतू अभ्यासाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेतील महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्तीची उजळणी व पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी या सेतू अभ्यासातून होणार आहे. राज्यभरातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या दहा लाख विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रम वीस दिवस शिकवला जाणार आहे.

राज्यातील मराठी शाळांमध्ये ४ जुलै ते २६ जुलै सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी केली जात आहे. या सेतू अभ्यासक्रम निर्मितीत जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा हातभार आहे. राज्यभरातील गुणवंत व प्रयोगशील शिक्षकांची या वर्षी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यासाठी निवड झाली होती.

विद्यार्थ्यांच्या आकलन- बुद्धीनुसार तयार करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत ज्या त्या विषयाच्या समिती गठित करून ठरवला जातो. यात राज्यभरातील विविध जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता, विविध जिल्ह्यातील पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख,व उपशिक्षक या तज्ज्ञ व्यक्तींची निवड केली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वयानुरूप अभ्यासक्रम निवडताना व निर्माण करताना निवड समितीचाही कस लागतो. राज्यभरातून अशा गुणवंत शिक्षकांना राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेत तीन महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णवेळ बोलावले जाऊन सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात येत असतो. .

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teachers
Success Story : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कैलासची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

सेतू अभ्याक्रम निर्मितीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालक्ष्मीनगर (ता. मालेगाव) शाळेच्या शिक्षिका मनिषा सावळे व जिल्हा परिषद शाळा माळेगावकाजी (ता. दिंडोरी) शाळेचे शिक्षक गुलाब दातीर यांची इयत्ता दुसरीच्या मराठी विषयाच्या,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी (ता. इगतपुरी) येथील प्रदीप खैरनार व जिल्हा परिषद शाळा मनखेड (ता.सुरगाणा) येथील प्रतिक्षा गायकवाड यांची इयत्ता चौथीच्या इंग्रजी विषयासाठी, ओझरखेड (ता.दिंडोरी) येथील विश्वास पाटोळे यांची इयत्ता ७ वी मराठी व या विषयांच्या कृतीपत्रिका निर्मितीमध्ये सहभागी झालेले आहे.

त्यांच्या कार्याबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल गौतम यांनी अभिनंदन केले आहे.

Teachers
Success Story: बागलाणच्या भूमिपुत्राने रशियात मिळवली MBBS पदवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com