Success Story: बागलाणच्या भूमिपुत्राने रशियात मिळवली MBBS पदवी

Dr. Atharv Tatar receiving Bachelor of Medicine and Bachelor of Surgery degrees from Osh State Medical University Vice-Chancellor Roman Kalmarov in Russia.
Dr. Atharv Tatar receiving Bachelor of Medicine and Bachelor of Surgery degrees from Osh State Medical University Vice-Chancellor Roman Kalmarov in Russia.esakal

Success Story : बागलाणचे भूमिपुत्र व सटाणा शहरातील रहिवासी डॉ. अथर्व अनिल ततार यांनी किरगीस्थान (रशिया) येथील ओश स्टेट मेडिकल विद्यापीठातून बॅचलर ऑफ मेडिसिन ॲण्ड बॅचलर ऑफ सर्जरी ही पदवी मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

ओश विद्यापीठात झालेल्या पदवीदान सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू रोमन कालमारोव यांच्या हस्ते डॉ. अथर्व ततार यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. (Success Story Bhoomiputra dr atharva tatar of Baglan obtained MBBS degree in Russia nashik)

डॉ. ततार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सटाणा येथील बेस्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. तर बाभूळगाव (ता.येवला) येथील संतोष दराडे महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर पुणे येथे ज्ञानमुद्रा टिटोरियल येथून सीईटी नीट परीक्षा पास होऊन त्यांनी पुढील शिक्षणासाठी गुणवत्तेच्या बळावर किरगीस्तान (रशिया) देशातील ओश स्टेट मेडिकल विद्यापीठात प्रवेश मिळविला. सहा वर्षे एमबीबीएसचा कठोर अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dr. Atharv Tatar receiving Bachelor of Medicine and Bachelor of Surgery degrees from Osh State Medical University Vice-Chancellor Roman Kalmarov in Russia.
PSI Success: तब्बल 21 वेळा स्पर्धा परीक्षा देऊनही मानली नाही हार! इंजिनिअर शेतकरी सत्वपरिक्षा देऊन झाला फौजदार

कोरोना काळात भारतात सुट्टीवर आलेल्या डॉ. अथर्व ततार यांनी सर्जन डॉ.योगेश विंचू, डॉ.प्रकाश जगताप, डॉ.प्रवीण अहिरे, डॉ.वजीर, डॉ.प्रवीण अहिरे व डॉ. हरजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा शहरातील सिम्स रुग्णालय, चैतन्य रुग्णालय, अपेक्स रुग्णालयांमध्ये गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी सेवा बजावली होती.

डॉ. अर्थव ततार यांची बहीण दर्शनी ततार यांनी सुद्धा जॉर्जिया (युरोप) देशात शिक्षण घेऊन डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. डॉ. अर्थव हे प्रसिद्ध व्यापारी नथू ततार यांचे नातू, व्यापारी अनिल व सामाजिक कार्यकर्त्या रूपाली ततार यांचे पुत्र आहेत.

Dr. Atharv Tatar receiving Bachelor of Medicine and Bachelor of Surgery degrees from Osh State Medical University Vice-Chancellor Roman Kalmarov in Russia.
Success Story : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कैलासची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com