नाशिक : धर्मांतर रॅकेट प्रकरण! पोलिस यंत्रणा खडबडून जागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cp deepak pandey

नाशिक : धर्मांतर रॅकेट प्रकरण! पोलिस यंत्रणा खडबडून जागी

नाशिक : धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीत उत्तर प्रदेशातील दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर नाशिक पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहर पोलिसांनी सोमवारी संशयिताच्या पालकांची चौकशी केली. नेमकं प्रकरण काय?

जबरदस्तीने धर्मांतर?

उत्तर प्रदेशात जबरदस्तीने धर्मांतर प्रकरण गाजत असताना नाशिकला सिडकोत अशा प्रकारचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांकडे तशी तक्रारही आली आहे. मात्र, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. पूर्ण चौकशी झालेली नसल्याने पोलिसांनी कुठलेही भाष्य केलेले नाही. चौकशी करून त्यात तथ्य आढळले तरच पोलिस कारवाई करतील. अजून चौकशी सुरू आहे, कुठलाही गुन्हा दाखल नाही, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात पूर्ण चौकशी झालेली नसल्याने या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी मौन राखले आहे. पूर्ण चौकशी झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: शाळा उघडण्याचा आनंद अन् रुग्णवाढीचे टेन्शनही!

या प्रकरणाच्या चौकशीकडे लक्ष

पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी उपनगर पोलिस ठाण्यात कुणालचे वडील अशोक चौधरी यांना बोलावून चौकशी केली. अशोक चौधरी हे लष्करातील निवृत्त जवान असून, त्यांनी मात्र उपनगरला प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांच्या मुलावरील आरोप फेटाळले. मुलाचा विवाहच झाला नसल्याचे सांगत अवैध धर्मातर रॅकेटबाबत काही माहीती नसल्याचे सांगितले. नाशिक पोलिसांनी याविषयी कुठलेही अधिकृत माहीती दिली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा: नाशिक : तब्बल सहा नगरसेवकांवर गुन्हे दाखल

loading image
go to top