शाळा उघडण्याचा आनंद अन् रुग्णवाढीचे टेन्शनही!

school
schoolesakal

येवला (जि.नाशिक) : जानेवारी-फेब्रुवारीत शाळांना लागलेले कुलूप आठ महिन्यांनंतर उघडण्याचा आशावाद निर्माण झाला असून, पालकांसह विद्यार्थ्याना या निर्णयाने नक्कीच आनंद झाला आहे. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे. दोन आठवड्यांपासून तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही रोज एखादे मूलही बाधित निघत असून, पालक-शिक्षकांचे टेन्शनही वाढत आहे.

दीड वर्षात दोन महिने शाळा!

कोरोनाची लाट आली अन् २०२० च्या मार्चमध्ये शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली. त्यानंतर जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले पण शाळा उघडण्याची वेळच न आल्याने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाला. त्यातील मर्यादा काही महिन्यातच उघड झाल्या. शिक्षक अभ्यासाचे व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर टाकत राहिले तसेच काहींनी झूम व गुगल मॅपवर थेट अभ्यास घेतला. परंतु विद्यार्थ्यांचा या पद्धतीला अल्प प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने झूम-गुगल मीट केव्हाच बंद करून व्हिडीओ टाकण्याचा पर्याय शिक्षकांना अवलंबावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास समजत नाही. लाट ओसरताच दिवाळीनंतर काही शाळा सुरू झाल्या. पण त्या जानेवारी-फेब्रुवारीतच पुन्हा बंद करण्याची वेळ आली. किंबहुना दहावी- बारावीची बोर्डाची परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली.

school
नद्यांच्या संवर्धनातून सांस्कृतिक पर्यटन विकास

जुलैपासून वर्ग भरले सुरळीतपणे

यावर्षी नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जुलैपासून रुग्ण नसलेल्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत.तालुक्‍यातील सुमारे पंधरा ते वीस शाळा गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सुरू असून नियमितपणे अध्ययन- अध्यापन सुरू झाल्याने पालकांसह विद्यार्थीही आनंदात आहे. विशेष म्हणजे मास्क, सॅनिटायझरचा वापर, एका बेंचवर एकच विद्यार्थी असे नियम पाळून शाळा सुरू असून कुठलाच अडथळा आलेला नाही. याउलट शहरासह मोठ्या गावच्या गावच्या शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासावरच भरोसा ठेवण्याची वेळ येत असून, यामुळे पालक व विद्यार्थी नाखूश आहेत.

आता सर्वच लागले कामाला

४ तारखेपासून पाचवी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला असून याचे सर्व स्तरातून स्वागत झाले आहे.विशेषता विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रही याचे स्वागत करत असताना तालुक्यात मात्र मागील दोन आठवड्यापासून रुग्ण संख्येतील वाढ चिंतेचा विषय बनली आहे.मागील महिन्यात तीस-पस्तीस रुग्ण असलेल्या या तालुक्यात आज शंभरावर रुग्ण ॲक्टिव्ह असून सुमारे ३५ गावांना पुन्हा विळखा घातला आहे.त्यामुळे वाढलेल्या रुग्णसंख्येची साडेसाती शाळा सुरू करण्याला ब्रेक तर ठरणार नाही ना.. याचीही चिंता आत्ताच लागली आहे. तालुक्यात माध्यमिक ४८ शाळा असून, सातवीपर्यंत वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या ४७ शाळा आहेत.याशिवाय दहावी पर्यंतच्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून शंभरावर शाळांचे शेकडोवर्ग चार तारखेनंतर प्रत्यक्षात भरलेले दिसतील.त्यासाठीची तयारी शिक्षण विभागासह शाळांनी देखील सुरू केली आहे.

school
कोरोनानंतर पर्यटनाकडे ओढा असल्याने व्यवसायाला संधी

२० मुलेही निघाली बाधित

गंभीर म्हणजे आरोग्य विभागाने तिसर्‍या लाटेत मुले बाधित होण्याची शंका वर्तविली आहे.त्याचा अल्पसा संदर्भ येथे लागत असून मागील दोन आठवड्यात तालुक्‍यात २० वर्षाखालील वयाची १८ ते २० मुले बाधित निघाली आहेत.यामध्ये धुळगावला ६,अंगणगावला ३,डोंगरगाव, नगरसुल,साबरवाडी,अनकुटे,नांदूर येथे प्रत्येकी एक तर पिंपळगाव जलाल, गवंडगाव,पाटोदा येथे दोन मुले बाधीत आहेत.यामुळेच शिक्षक पालकांचे टेन्शन वाढले आहे.मात्र शाळा सुरू होईपर्यंत बाधितांच्या आकड्यात घसरण झाली तर नियमितपणे शाळा सुरू होताना दिसतील हे नक्की.शिक्षक मात्र आपल्या शिष्यांच्या प्रतीक्षेत तर विद्यार्थी आपले वर्ग मित्र, आणि शिक्षकांच्या भेटीसाठी आतुरलेले दिसताय.रुग्ण नसलेल्या गावात मात्र शाळा नक्कीच सुरु होणार आहे.

शासनाच्या गाइडलाइननुसारच शाळा सुरू केल्या जातील. तालुक्यात सध्या १५ ते १८ शाळा नियमितपणे सुरू असून, उर्वरित शाळा ४ तारखेनंतर नियमात बसत बसल्यास सुरू होतील. रुग्णसंख्या असलेल्या गावातील शाळा सुरू करता येणार नाही,या संदर्भात आढावा घेऊनच नियमात बसत असतील तर शाळा निर्णय सुरू करण्याचा निर्णय होईल."

-मनोहर वाघमारे, गटशिक्षणाधिकारी, येवला

शाळा सुरू करण्यासाठी यापुर्वीच शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे मागणी होती.शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे मात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून इतर आरोग्य सुविधा शासनाने पुरवाव्यात.सर्वच खबरदारी उपाय हे केवळ शिक्षकांकडे न सोपवता शासन,पालकाचाही यात सहभाग असावा, म्हणजे शाळा सुरळीत चालतील.

-शांताराम काकड,अध्यक्ष,प्राथमिक शिक्षक संघ,येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com