

sakal
किरण कवडे- ‘विना सहकार, नाही उद्धार’ हे ब्रीद साकार करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांसाठी सरते वर्षे फारसे लाभदायी ठरले नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना वाचविण्यासाठी राज्य शासनाने ६७२ कोटींचे अर्थसाहाय्य करण्याची हमी घेतली. हा दिलासा मिळाला. पण बँकेला अधिकृतपणे अद्याप लेखी उत्तर प्राप्त झालेले नाही. याशिवाय जिल्ह्यातील महत्त्वाच्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात बंड करत सत्तापरिवर्तन घडविले, ही विशेष घडामोड ठरली.