नाशिक: राज्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या संस्थांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना करण्यासंदर्भात ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करून राज्य सरकारकडे मांडण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सहकारी पतसंस्थांचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन भाजपचे गटनेते, मुंबई बँकेचे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी नाशिकमध्ये दिले.