Corona Updates : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची थाप; 8 दिवसात 4 रुग्ण

coronavirus
coronavirusesakal

नाशिक : कोरोना (Corona) बाबतीत निर्धास्त झालेल्या नागरिकांना पुन्हा आता काळजीत टाकण्यास सुरवात केली आहे. मागील आठ दिवसात जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल चार कोरोनाचे रुग्ण (Corona patients) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिन्नर तालुक्‍यात दोन तर निफाड व देवळा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहे, मात्र चारही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतात होम आयसोलेशनमध्ये (Isolation) ठेवण्यात आल्याने ही बाब दिलासादायक म्हणता येईल. (Corona active again in the district 4 patients in 8 days Nashik corona updates News)

मागील अडीच वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावाने हैरान झालेल्या नागरिकांना जानेवारी महिन्यापासून हायसे वाटले होते. त्याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) झाल्याने कोरोना तिसऱ्या लाटेचा पाहिजे, तसा प्रभाव झाला नाही. शासनानेदेखील सुटकेचा निःश्वास सोडत हळूहळू निर्बंध उठविले. आता तर मास्कचीदेखील सक्ती नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जसे व्यवहार होते. त्याप्रमाणे कामकाज सुरळीत सुरू आहे. सर्व प्रकारच्या व्यवहारांची गाडी रुळावर येत असताना राज्यात गेल्या पंचवीस मेपासून कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे.

मुंबई, पुणे या मेट्रो शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना नाशिक जिल्ह्यातही ग्रामीण भागात आढावा घेण्यात आला. मागील आठ दिवसात जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने २२०० नागरिकांच्या तपासण्या केल्या, त्यात चार कोरोना रुग्ण आढळून आले. मे महिन्याच्या मध्यात कोरोनाच्या शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एक ते सात जून या कालावधीत चार नवीन रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्ण आढळून आले असले तरी घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले.

बरे होण्याचे प्रमाण अधिक

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७७ हजार एकशे एकोणतीस कोरोना रुग्ण आढळून आले यात एक लाख ७२ हजार ८२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले ग्रामीण भागात ४३०४ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत कोरड साथीला तोंड देण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करण्यात आला

coronavirus
ऑनलाईन फसवणूकीतील रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात सुपूर्द

जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोनाची स्थिती

तालुका एकूण रुग्ण

नाशिक २४,४५४

चांदवड दहा हजार ८३३

देवळा नऊ हजार २३५

दिंडोरी १२,९२५

इगतपुरी ७,९४६

कळवण ६,५३८

मालेगाव ९ हजार ९१७

नांदगाव १३,४०३

निफाड २९ हजार ३४१

पेठ एक हजरत ३१३

सिन्नर २४ हजार ३०

सुरगाणा दोन हजार ४४७

त्र्यंबक पाच हजार ३७८

येवला आठ हजार ३१७

एकूण १,७७,१२९

coronavirus
नाशिक : उद्योजकावरील हल्ला दुर्दैवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com