esakal | स्मशानभूमीत कारने आला मृतदेह; सुरगाणाच्या ३ मुलांवर नामुष्की
sakal

बोलून बातमी शोधा

cemetery

स्मशानभूमीत कारने आला मृतदेह; सुरगाणाच्या ३ मुलांवर नामुष्की

sakal_logo
By
रतन चौधरी

सुरगाणा (जि.नाशिक) : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरअभावी रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यातच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडत आहे. सुरगाणा तालुक्यात असाच प्रकार घडला. पित्याचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर चक्क मुलांनी कारमधून स्मशानभूमीपर्यंत पित्याचा मृतदेह नेला. काय घडले नेमके?

स्मशानभूमीत मुलांनी कारने आणला मृतदेह

तालुक्यात पार्थिव नेण्याकरिता शववाहिका नसल्याने अखेरच्या प्रवासात कारमधून पित्याचे पार्थिव थेट स्मशानभूमीत पोचविण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ तिघा पुत्रांनी ओढवली आहे. अंत्ययात्रेत ‘राम, नाम सत्य है’ असा जप केला जातो, तसेच बिगर खांदेकरी व बिगर तिरडीने अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंब व ग्रामस्थांवर आली होती. मुलांनी स्वतःच कार चालवत वडिलांचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेले. आदिवासी भागात पहिल्यांदाच ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदय हेलावून टाकणारी घटना

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरअभावी रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे. त्यातच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडत आहे. सुरगाणा तालुक्यात असाच प्रकार घडला. पित्याचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध न झाल्याने मुलांनी कारमधून स्मशानभूमीपर्यंत पित्याचा मृतदेह नेला. एरवी आदिवासी भागात एखादी दु:खद घटना घडल्यास संपूर्ण ग्रामस्थ मदतीला धावून येतात. येथेही मदतीकरिता ग्रामस्थ आले. मात्र, कोविड नियमांचे पालन करून मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याच्या अटीवर पोलिसांनी लेखी हमीपत्रावर पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात दिले होते. गावातील कोरोना दक्षता समितीच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कोरोनाचे नियम पाळण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेळेवर उपचार न घेतल्यानेच मृत्यू

संबंधित रुग्णास दहा ते बारा दिवसांपासून कोरोनासदृश लक्षणे जाणवत असताना घरगुती उपचार, तसेच कोणतीही कोरोनाची तपासणी न करताच खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले. मंगळवारी (ता. १३) पहाटे रुग्णास श्‍वासोच्छ्‍वासास त्रास होत असल्याने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रुग्णाच्या नातेवाइकांनी वेळीच सरकारी दवाखान्यात कोविड चाचणी करून उपचार केले असते तर ती व्यक्ती वाचली असती. रुग्णाची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे, पण कोरोनाची लागण झाल्याच्या सहाव्या दिवसानंतर कोरोनाची टेस्ट केली असता रुग्ण कोरोनाबाधित असला तरी टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात दाखल होऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सुरेश पांढुले यांनी केले आहे.