esakal | येवला ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख चिंताजनक; मृत्यूचे प्रमाणही अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

corona

येवला तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण प्रमाणही कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात संक्रमण आणि रुग्णवाढीचा वेग वाढत आहे.

येवला ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख चिंताजनक

sakal_logo
By
प्रमोद पाटील

चिचोंडी (जि. नाशिक) : येवला तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण प्रमाणही कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात संक्रमण आणि रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णवाढीने मोठा धोका निर्माण झाला आहे. (Corona infection and morbidity rate are increasing in rural areas of Yeola taluka)


आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील रुग्णसंख्यावाढीचा दर कमी झाल्याचेही दिसून येत आहे. या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. येवला शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळत असला तरी ग्रामीण भागात वाढणारी दररोजची रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर टाकत आहे. प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला गावपातळीवरील नियोजनावर आणखीन भर देणे गरजेचे आहे. येवला तालुक्यात अत्यावश्यक सेवा व दुकानांना सकाळी सात ते अकरा अशी वेळ ठरवून देण्यात आली. मात्र ग्रामीण भागातील अनेक दुकानेही बिनबोभाटपणे सुरू असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागात घरी विलगीकरण असलेले अनेक पॉझिटिव्ह रुग्ण स्थानिक प्रशासनाला न जुमानता खुलेआम फिरताना दिसत आहेत. कोणालाही कल्पना न देता आपण पॉझिटिव्ह असल्याची माहिती गुप्त ठेवताना दिसून येत आहे. त्यांच्या या बिनधास्त फिरण्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची व हेच रुग्ण ग्रामीण भागात कोरोना स्प्रेडर बनत असल्याने समोर येऊ लागले आहे. अनेक गावांत ग्रामपंचायती कसून कामाला लागल्या, मात्र कोरोनाला हद्दपार करण्यात त्यांना अपयश येत आहे. ग्रामीण भागातील आठवडेबाजारांनाही नागरिकांची गर्दी होत आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा केवळ कागदावरच असल्याने अनेक गावांत रुग्णवाढीचा वेग आजही वाढलेला दिसत आहे. गावागावातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील व स्थानिक सरपंचांनी आता दक्ष होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्जग्रामीण भागातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. शहरातील कोरोना रुग्ण कमी होत असून, ग्रामीण भागात वाढत असलेला रुग्णवाढीचा वेग कमी करण्यासाठी गावागावांत नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्वांनी कोरोना हद्दपार करण्यासाठी घरी राहून सहकार्य करा.
-सचिन आहेर, सरपंच, पारेगाव (ता. येवला)आठ दिवसांतील येवला तालुक्यातील रुग्ण

तारीख ग्रामीण शहरी
१८ ३७ ०४
१९ १२ ००
२० २४ ०४
२१ ४४ ०६
२२ ७८ ३१
२३ ०६ ०३
२४ ३५ ००
२५ १९ ००

(Corona infection and morbidity rate are increasing in rural areas of Yeola taluka)

हेही वाचा: म्युकरमायकोसिसला घाबरू नका, मात्र सतर्क राहा