Nashik Corona Update : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Nashik Corona Update : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण

नाशिक : कोरोनासंदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत असतानाच सोमवारी (ता. १३) जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील सहा आणि ग्रामीण भागातील सात रुग्णांचा समावेश आहे. (Corona patients again in district Nashik Corona Update)

त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, वाशीम व उस्मानाबाद जिल्ह्यांत कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नाशिक महापालिका हद्दीत कोरोनासदृश परिस्थिती नाही, असा दावा केला जात आहे. मात्र गेल्या आठवड्यात सात रुग्ण आढळले असतानाच सोमवारी पुन्हा सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना पुन्हा वाढतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

दरम्यान, ग्रामीण भागातही सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या शहरात अकरा, तर ग्रामीण भागात १४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. बदलत्या हवामानामुळे शहरात स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढत आहेत.

सर्दी, ताप व खोकलासदृश आजारांमधील रुग्णांची तपासणी केली असता, त्यातूनही कोविडचे रुग्ण समोर येत असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे.

टॅग्स :CoronavirusNashik