Nashik News: बिटको रूग्णालयात कोरोना ‘रॅपिड’ टेस्ट सुरू! अत्याधुनिक मॉलिक्युलर लॅब लवकरच सेवेत

नवीन विषाणू आल्यामुळे बिटकोत कोरोना रॅपिड टेस्ट सुरू आहेत.
Bytco Hospital
Bytco Hospitalesakal

नाशिक रोड : कोरोना दोन्ही लाटांमध्ये एक पैसाही न घेता लाखो गरिबांचे प्राण वाचविणाऱ्या नाशिक रोडच्या बिटको रूग्णालयातील अत्याधुनिक मॉलिक्युलर लॅब लवकरच पुन्हा सुरु होणार आहे.

नवीन विषाणू आल्यामुळे बिटकोत कोरोना रॅपिड टेस्ट सुरू आहेत. गेल्या आठ दिवसात बिटकोत ३८ संशयित रुग्ण आले. टेस्ट केल्या असता त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले.

बिटकोत दर्जेदार उपचार उपलब्ध आहेत. ज्यांनी लस घेतली ते त्यांची प्रतिकार शक्ती टिकून आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. (Corona rapid test started in Bytco Hospital state of art molecular lab will soon be in service Nashik News)

मॉलिक्युलर लॅब लवकरच पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. शिल्पा काळे आदी डॉक्टर व सहकारी सज्ज झाले आहेत.

सन २०२० मध्ये कोरोना लाटेत रुग्णांचे तपासणी अहवाल पुणे आणि औरंगाबादला पाठवावे लागत होते. त्यात मौल्यवान वेळ वाया जाऊन रुग्णांचे प्राण धोक्यात येत होते.

हे लक्षात घेऊन बिटको रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून एप्रिल २०२१ मध्ये युद्धपातळीवर अत्याधुनिक मॉलिक्युलर लॅब सुरू करण्यात आली.

या लॅबची क्षमता दिवसाला दोन हजार आरटीपीसीआर नमुने टेस्ट करण्याची आहे. ही लॅब चालू होती, तोपर्यंत एक लाख ८० हजार करोना टेस्ट करण्यात आल्या. नंतर करोना रुग्णच नसल्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये लॅब बंद करण्यात आली.

Bytco Hospital
NMC News : नाशिक महापालिका पूर्व विभागात जन्मदर वाढला, मृत्यूदर घटला

नाशिक रोड विभागात कोरोनाच्या सव्वा तीन लाख लस देण्यात आल्या आहेत. बिटकोत एप्रिल २०२० पासून कोरोना उपचार सुरू झाले. येथील डॉक्टरांनी चोवीस तास सेवा देत, आपला जीव धोक्यात घालून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले.

सुरवातीला अग्निशमन दलाच्या इमारतीत उपचार केले जात असे. नंतर नवीन बिटको रुग्णालय आणि अत्याधुनिक लॅब कार्यान्वित झाली. २०२० पासून बिटकोत नाशिकसह राज्यभरातून २५ हजार ६६६ रुग्ण दाखल झाले होते.

त्यापैकी २४ हजार ३०८ बरे झाले. फक्त ९३६ रुग्णांचा मृत्यू झाला. व्हेटिंलेटर नव्हते तेव्हा ३५० जणांना अन्य रुग्णालयात पाठविण्यात आले. कोरोना दुसरी लाट आल्यावर लहान मुलांचा विशेष कक्ष सुरू करण्यात आला.

त्यात ११७ बाल रुग्ण दाखल होऊन बरे झाले. मोठ्या रुग्णालयात लाखो रुपये खर्चून फरक पडला नाही तो फरक बिटकोतील मोफत सेवा आणि औषधोपचारामुळे पडून लाखो करोना रुग्णांचे प्राण वाचले.

नागरिकांनी कोरोनाच्या नव्या विषाणूला घाबरू नये. योग्य खबरदारी घ्यावी. कोरोना संकट कमी झाल्यापासून बिटकोतील लॅब बंद आहे. या लॅबचा दुसऱ्या रुग्णांसाठी लाभ झालेला नाही. एवढी महागडी लॅब महापालिका प्रशासनाने गरीब रुग्णांसाठी चालू ठेवायला पाहिजे होती.

Bytco Hospital
Corona JN1 Variant: प्रसाराचा वेग वाढला, तरी संसर्ग घातक नाही! जेएन.१ व्हेरियंटच्या संसर्गावर तज्ज्ञांचा सल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com