esakal | नाशिककरांनो काळजी घ्या! महिनाभरात रुग्णसंख्या फक्त 100 ने कमी - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal

नाशिककरांनो काळजी घ्या! रुग्णसंख्या फक्त 100 ने कमी - भुजबळ

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : कोरोनाची (corona second wave) दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची (corona third wave) तयारी होत आहे. संभाव्य कालावधीपूर्वीच शहरात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याचा संशय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे. महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील (nashik district) रुग्णसंख्या फक्त 100 ने कमी झाली आहे. अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली. नियोजन भवन या ठिकाणी कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.8 असून सध्या 8300 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. तसेच मृत्यूदर 2.11आहे. नाशिकमधील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या घटली असून जिल्ह्यात आत्तापर्यंत 36 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी दिली आहे. नियोजन भवनमध्ये पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षी शहरात मार्चमध्ये कोरोनाची लाट आली. ऑक्टोबरपर्यंत ती ओसरली. त्यानंतर या वर्षाच्या जानेवारीअखेर कोरोनारुग्ण वाढू लागले. दुसऱ्या लाटेला गर्दी, निष्काळजीपणा कारणीभूत ठरला होता. कोरोनाची दुसरी लाट जूनअखेर ओसरण्यास सुरवात झाली. आतापर्यंत दोन लाख २५ हजार ११६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. पावणेदोन वर्षांत कोरोनामुळे तीन हजार ९७० मृत्यू झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४५५, तर १९६ नमुने प्रलंबित आहेत. एप्रिल व मेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या प्रतिदिन अडीच हजारांच्या पुढे होती. लाट ओसरत असताना गेल्या आठवड्यापर्यंत १६ पर्यंत रुग्ण आढळून आल्याने कोरोना संसर्गाची लाट पूर्णपणे ओसरत असल्याचे चित्र होते. मात्र, दोन दिवसांत पन्नासच्या पुढे कोरोनारुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय विभागासमोरची चिंता वाढली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १५ दिवसांपर्यंत एचआरसीटी पूर्णपणे बंद होते. मात्र, दोन दिवसांत आठ ते दहा नागरिकांनी स्कॅन केले. कोरोनासाठी महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर तीन-चार दिवसांपासून २० ते २५ लोकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मानले जात असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा: नाशिक : आसारामबापू आश्रमाच्या संचालकाला अटक

हेही वाचा: शालेय शिक्षणाचं चांगभलं! ‘बॅकडेटेड’ मान्यतांची धूम सुरूच

loading image
go to top