esakal | नाशिक : आसारामबापू आश्रमाच्या संचालकाला अटक; गुजरात पोलीसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

asaram bapu

नाशिक : आसारामबापू आश्रमाच्या संचालकाला अटक

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : गुजरात (gujarat) येथील एका गुन्ह्यात १२ वर्षांपासून फरारी असलेल्या येथील आसारामबापू (asaram ashram) आश्रमाच्या संचालकाला गुजरात पोलिसांनी (gujarat police) गुरुवारी (ता.२) अटक केली. दरम्यान, गुजरात पोलिसांच्या या कारवाईची स्थानिक पोलिसांना काहीच माहिती नसल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात (panchvati police station) अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ३) पहाटे गुजरात पोलिसांच्या कारवाईची उकल झाली. या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यातील नेमका प्रकार उघडकीस आणला आहे, असे पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले.काय घडले नेमके?

आसारामबापू आश्रमाच्या संचालकाला अटक

संजीव किशनकिशोर वैद्य (वय ४४) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वैद्य गंगापूर रोडवरील आसारामबापू आश्रमात अनेक वर्षांपासून संचालक म्हणून कार्यरत आहेत. गुजरात येथील एका गुन्ह्यात त्याचा १२ वर्षांपासून तपास सुरू असताना, त्याला गुरुवारी नाशिकमध्ये अटक करण्यात आली. वैद्य गुरुवारी गायीचे खाद्य खरेदीसाठी पंचवटीत गेला होता. तेथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पण रात्री त्याचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार आसारामबापू आश्रमाचे राजेश चंद्रकुमार डावर (रा. सावरकरनगर) यांनी दिली. सावरकरनगर येथील आश्रमाचे संचालक संजीव वैद्य गुरुवारी दुपारी पंचवटीतील सेवाकुंज भागात आश्रमातील गायींना पशुखाद्य खरेदीसाठी पिक-अप (एमएच ४८, टी ३०९६)मधून गेले होते. सेवाकुंज येथील नागसेठिया पशुखाद्य दुकानात ते खरेदी करीत असताना, इनोव्हा कारमधून आलेल्या अनोळखी चौघांनी त्यांना गाठून दमदाटी करीत वाहनात बसवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पंचवटी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. नंतर संबंधिताला अहमदाबाद पोलिसांनी तपासासाठी नेल्याचे पुढे आले. पोलिसांनी तपासाला नेलेल्या व्यक्तीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक केदार तपास करीत आहेत.

हेही वाचा: नाशिकच्या कांद्याची स्पर्धा! सिंगापूर-मलेशियामध्ये बोलबाला

गुजरात पोलिसांची कारवाई; सीसीटीव्हीत कैद

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये चौघे इनोव्हा क्रिस्टा गाडीतून घेऊन जात असल्याचे कैद झाले आहे. इनोव्हा क्रिस्टा गाडीचा घोटी, शिंदे- पळसे टोलनाक्यावर जाऊन शोध घेतला गेला. अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी नाशिकला येऊन कारवाई केली. या घटनेची खात्री करण्यासाठी अहमदाबाद क्राइम ब्रँचचे पोलिस निरीक्षक देसाई यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी साबरमती पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात १२ वर्षांपासून फरारी असल्याचे सांगून संजीव वैद्य याला नाशिकमधून ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. या संवेदनशील गुन्ह्याचा गुन्हा घडल्यापासून तपास करून गुन्ह्यातील नेमका प्रकार उघडकीस आणला आहे, असे पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले.

हेही वाचा: इंपिरिकल डाटा तयार करण्यास सर्वपक्षीयांचा होकार - भुजबळ

loading image
go to top