तुमच्या मोबाईलमध्ये ही आता कोरोना?...कॉल करुन तर पाहा

virus-dialer-tune (1).jpg
virus-dialer-tune (1).jpg
Updated on

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) चीनपाठोपाठ आता भारतातही कोरोना संशयित रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांच्या मनात धडकी भरली आहे. राज्यात अद्याप कोणाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आलेली नाही. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने जनजागृती सुरू केली आहे.

गर्दीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून संदेश दिला जातोय

नाशिक जिल्ह्यातील सर्वच बस आगारांतर्गत चालक, वाहकांकडून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वच्छतेची माहिती देण्यात येत आहे. या आजारापासून स्वत:ला वाचविण्यासाठी कोणती सावधता बाळगावी, याबद्दल सांगण्यात येत आहे. दरम्यान, दक्षता म्हणून अनेक ठिकाणी धूलिवंदन व रंगपंचमीचे कार्यक्रम रद्द केले जात आहेत. चार दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलच्या डायलर टोनवरही कोरोना बाबत जागृतीची धून वाजत आहे. यात कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेची माहिती दिली जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून सामान्य नागरिकांच्या मोबाईलवर कॉल केल्या नंतर ही डायलर टोन ऐकू येत आहे. प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकावरून संदेश दिले जात आहेत. गर्दीचे कार्यक्रम टाळण्याबाबत प्रशासन आवाहन करीत आहे. 

आपल्या भागात अजूनपर्यंत कोणताही संशयित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खबरदारी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या व्हायरसपासून बचावासाठी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. - डॉ. उमेश आहेर, राधाकृष्ण हॉस्पिटल, पिंपळगाव बसवंत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

tribal youth protest outside commissionerate Nashik
Shalarth ID Scam
School Education Minister Dadaji Bhuse during the meeting on the pending Satana–Mangrul National Highway project.
Nashik Earthquake
Marathi News Esakal
www.esakal.com