esakal | नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात ९८ कोरोनामुक्‍त; दोघांचा मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

नाशिक जिल्‍ह्यात दिवसभरात ९८ कोरोनामुक्‍त; दोघांचा मृत्‍यू

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यातील नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची दैनंदिन सरासरी शंभरपर्यंत आहे. बुधवारी (ता. ८) जिल्‍ह्यात १०२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ९८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली, तर दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ९२८ बाधितांवर उपचार सुरू आहेत.


बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ५० रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ग्रामीण भागातील रुग्‍णांच्‍या संख्येत काही प्रमाणात घट झाली असून, दिवसभरात ४८ रुग्‍णांना लागण झाली. जिल्‍हाबाहेरील चौघांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, मालेगावला नव्‍याने बाधित आढळला नाही. जिल्‍ह्यातील दोन मृतांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील व नाशिक ग्रामीणमधील प्रत्‍येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ७७९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ४१५, मालेगावच्‍या १८३, नाशिक शहरातील १८१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६८० रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ६५९ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात आठ रुग्‍ण दाखल झाले. डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील ११ रुग्‍णांचा समावेश होता.

हेही वाचा: नाशिक महापालिकेने 348 गणेश मंडळांना परवानगी नाकारली

loading image
go to top