esakal | नाशिक जिल्ह्यात आज १३४ कोरोना बाधित, चौघांचा मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

नाशिक जिल्ह्यात आज १३४ कोरोना बाधित, चौघांचा मृत्‍यू

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : एका दिवसाकरीता कोरोना बाधितांची संख्या घटलेली असतांना, या आकड्यात पुन्‍हा वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १३४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले तर १६२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. चार बाधितांचा मृत्‍यू झाला असून, हे सर्व नाशिक ग्रामीण भागातील आहेत. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ३२ ने घट झाल्‍याने, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ६१२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.


मंगळवारी (ता.१३) नाशिक महापालिका क्षेत्रात ५९, नाशिक ग्रामीणमध्ये ६५, मालेगावला तीन तर जिल्‍हा बाहेरील सात रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्‍यू झाला असून, सर्व मृत हे नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ९३० अहवाल प्रलंबित होते. नाशिक ग्रामीण क्षेत्रात ४३८ तर मालेगाव्‍या तीनशे रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. नाशिक महापालिका क्षेत्रात १९२ अहवाल प्रलंबित होते. दरम्‍यान जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दिवसभरात ४१९ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३८३ रुग्‍णांचा समावेश होता. दिवसभरात जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ.पवार वैद्यकीय महाविद्यालयात एकही रुग्‍ण दाखल झाला नाही. नाशिक ग्रामीण क्षेत्रात २८ तर मालेगाव क्षेत्रात आठ रुग्‍ण दाखल झाले. (134 new corona positive patients reported in nashik district)

हेही वाचा: नाशिकवर पाणी कपातीचे ढग! गंगापूर धरणात ३४ टक्केच जलसाठा

loading image