esakal | नाशिकवर पाणी कपातीचे ढग! गंगापूर धरणात ३४ टक्केच जलसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

Gangapur Dam

नाशिकवर पाणी कपातीचे ढग! गंगापूर धरणात ३४ टक्केच जलसाठा

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात पावसाने जुलैच्या मध्यापर्यंत ओढ दिल्याने ३३. ६५ टक्केच साठा शिल्लक आहे. यासंदर्भात सोमवारी (ता.१२) महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत दर बुधवारी पाणी कपात केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास नाशिककरांसमोर अजून पाणी कपातीचे ‘ढग’ दाटून येणार आहे. (Nashik Mayor Satish Kulkarni announced that water supply reduce in city)


नाशिकमध्ये पावसाने यंदा चांगलीच ओढ दिली आहे. महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय जाहीर केला असला तरी पावसाने पुढील आठवड्यातही दडी मारल्यास पाणी कपातीचे दिवस वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह कश्‍यपी, गौतमी, त्र्यंबक, अंबोली धरणांनी तळ गाठला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गंगापूर धरणात गेल्यावर्षी २९०१ दशलक्ष घनफूटमध्ये पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न नाशिककरांसमोर गंभीर होत असल्याचे दिसत असून, प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये उपयुक्त साठा कमी होत असून सध्यास्थितीत २७ टक्के साठा शिल्लक आहे.

हेही वाचा: नाशिक शहर बसचे लोकेशन एका क्लिकवर! नागरिकांमध्ये उत्सुकता


उपलब्ध जलसाठा (आकडा दशलक्ष घनफूटमध्ये, कंसात टक्केवारी)

  • गंगापूर धरण : एक हजार ८९५ (३३.६५)

  • कश्‍यपी : ३०९ (१६.६८)

  • गौतमी : २२४ (१२.१)


शहराला रोज १३ लक्ष घनफूट पाणी दिवसाला लागते. शहरातील नागरिकांनी पाण्याची काटकसर केल्यास ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल. सावधगिरीचा भाग म्हणून पाणी कपातीचे पत्र महापालिकेला पाठविले होते.
- ए. बी. वाघ, कनिष्ठ अभियंता, जलसंपदा विभाग


(Nashik Mayor Satish Kulkarni announced that water supply reduce in city)

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करणार असाल तर बातमी तुमच्यासाठी

loading image